शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
2
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
3
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
4
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
5
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
6
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
7
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
8
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
9
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
10
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
11
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
12
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
13
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
14
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
15
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
16
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
17
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
18
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
19
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
20
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगार टेंभ्याचा कौटुंबिक वादातून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 01:06 IST

तब्बल दहा दिवसांपूर्वी हिरावाडीतील गुंजाळमळा येथे चेंबरमध्ये मृतदेह आढळलेल्या विकी उर्फ टेंभ्या विजय भुजबळ (१९) या सराईत गुन्हेगाराचा खून त्याचा चुलत भाऊ असलेल्या रोहन भुजबळ याने मित्राच्या मदतीने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

पंचवटी : तब्बल दहा दिवसांपूर्वी हिरावाडीतील गुंजाळमळा येथे चेंबरमध्ये मृतदेह आढळलेल्या विकी उर्फ टेंभ्या विजय भुजबळ (१९) या सराईत गुन्हेगाराचा खून त्याचा चुलत भाऊ असलेल्या रोहन भुजबळ याने मित्राच्या मदतीने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.याबाबत दोघांना ताब्यात घेतले असून, मयत टेंभ्या कौटुंबिक वादातून जिवे मारण्याची धमकी देऊन त्रास द्यायचा म्हणून त्याचा काटा काढण्यासाठी दृश्यम सिनेमा बघून खुनाचा कट रचल्याची कबुली संशयितांनी पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी रोहन भुजबळ व त्याचा मित्र अनिल भोंड या दोघांना ताब्यात घेतले आहे.भुजबळ गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याचा घात केला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली व त्यादृष्टीने पंचवटी पोलीस तसेच गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तपास सुरू केला. मयत भुजबळ याला शेवटचे रात्री कोण भेटले, कोणी बघितले याची माहिती जमा करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले असता विकी हा त्याच्या चुलत भावाबरोबर बुलेटवर बसून गेल्याचे काहींनी बघितले होते. नंतर पोलिसांनी रोहनला ताब्यात घेत चौकशी केली असता दि.१२ एप्रिलला भुजबळ रोहनच्या आइस्क्र ीम दुकानावर गेला. तेथे आइस्क्र ीम खाल्ल्यानंतर रोहनच्या पुतण्या प्रतीकने पैसे मागितल्यावर टेंभ्याने वाद घातला. त्याने यापूर्वी अनेकदा रोहनला विक्र ी केलेले घर परत देण्याची मागणी करत ठार मारण्याची धमकी दिली होती. घटनेनंतर दि.१३ एप्रिलच्या रात्री संशयित आरोपींनी टेंभ्याला दारू पिण्याच्या बहाण्याने बुलेटवर बसवून गुंजाळमळा परिसरात नेले. तेथे भरपेट दारू पिऊन शुद्ध हरपलेल्या टेंभ्याला चेंबरमध्ये टाकून दिले होते. पोलीस निरीक्षक के. डी. पाटील, पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.बारा दिवसांपूर्वी हिरावाडी गुंजाळमळा येथे सुमारे २0 फूट खोल चेंबरमध्ये एका इसमाचा मृतदेह आढळून आला होता. चेंबरजवळ कुत्रे भुंकत असल्याने शरद गुंजाळ यांनी पाहणी केली असता चेंबरमध्ये मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्यांनी पंचवटी पोलिसांना माहिती दिली होती. मयताच्या अंगावर कोणत्याही जखमा नसल्याने सदरचा प्रकार खुनाचा नसल्याची शक्यता वर्तविली जात होती. दोन दिवसांनी चेंबरमध्ये आढळलेला मृतदेह सराईत गुन्हेगार टेंभ्या उर्फ विकी भुजबळ याचा असल्याचे निष्पन्न झाले होते.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय