बलात्कार प्रकरणातील संशयित निघाला खुनी
By Admin | Updated: July 26, 2016 01:00 IST2016-07-26T01:00:47+5:302016-07-26T01:00:59+5:30
बलात्कार प्रकरणातील संशयित निघाला खुनी

बलात्कार प्रकरणातील संशयित निघाला खुनी
नाशिकरोड : दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार प्रकरणी नाशिकरोडच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने गेल्या शनिवारी जळगाव पोलिसांनी मुसक्या आवळलेल्या संशयीत राजु निकम हा शातीर गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. अकरा वर्षापूर्वी भोपाळमध्ये एका मित्राच्या मदतीने दुसऱ्या मित्राचा खून करून तो कारागृहातून पळून खोट्या नावाने जळगावमध्ये वास्तव्यास होता.
जळगाव मेहरूण परिसरातील रामेश्वर कॉलनीतील झोपडपट्टीत राहाणाऱ्या १० वर्षाच्या मुलीवर आठ दिवसापूर्वी राहत्या घरात बलात्कार करून त्याच भागात राहाणारा संशयित रिक्षाचालक राजु रमेश निकम (वय ४२) फरारी झाला होता. जळगाव एमआयडीसी पोलीस संशयिताचा शोध घेत होते. जळगाव पोलिसांनी संशयित राजु याचे सर्व नातेवाईक व त्यांच्या मोबाईल क्रमांकावर वॉच ठेवला होता. पळुन गेल्यानंतर राजु याने चार दिवसांनी आपल्या मुलीच्या सासुला फोन करून सर्व हकीकत सांगितली होती. या मोबाईल क्रमांकाचा पोलिसांनी शोध घेतला असता गेल्या शनिवारी सकाळी मनमाड परिसरात मोबाईलचे लोकेशन मिळाले होते. दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शनिवारी सकाळपासुनच जळगावचे पोलीस नाशिक, नाशिकरोड परिसरात संशयित राजुचा शोध घेत होते. दरम्यान फरारी राजुचा फोटो व्हॉटस्अपवर व्हायरल झाला होता. पोलीस कर्मचारी उत्तम साबळे, अनिल घुले नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरात समीर शेख, विनायक गोसावी यांच्या मदतीने राजुचा शोध घेत असताना रेल्वे स्थानक परिसरातील देशी दारू दुकानात संशयीत राजूच्या मुसक्या आवळल्या. (प्रतिनिधी)