मालेगावी यंत्रमाग कारखान्याजवळ तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:15 IST2021-07-30T04:15:27+5:302021-07-30T04:15:27+5:30

अनिस अहमद याची मोटरसायकल अशफाक अहमद यास वापरण्यासाठी दिली नाही, म्हणून याचा राग मनात धरून त्याने अनिसची ...

Murder of a youth near Malegaon spinning mill | मालेगावी यंत्रमाग कारखान्याजवळ तरुणाचा खून

मालेगावी यंत्रमाग कारखान्याजवळ तरुणाचा खून

अनिस अहमद याची मोटरसायकल अशफाक अहमद यास वापरण्यासाठी दिली नाही, म्हणून याचा राग मनात धरून त्याने अनिसची युनिकॉर्न दुचाकी त्याच्या राहत्या घरासमोर उभी केली असताना तिच्यावर मोठा दगड टाकून नुकसान केले. तसेच वेळोवेळी जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास संशयित आरोपी अशफाक अहमद आणि मोहंमद रजा यांनी धारदार शस्त्राने पोटाच्या दोन्ही बाजूस, दोन्ही हात आणि मांड्यांवर वार केले. यात तो गंभीर जखमी झाल्याने सामान्य रुग्णालयात उपचारार्थ नेले असता डॅाक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. आयेशनगर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत. सलग दुसऱ्या दिवशी शहरात खुनाची घटना घडल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे.

Web Title: Murder of a youth near Malegaon spinning mill