शाळकरी मुलाचा गळा आवळून निघृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:27 IST2020-12-03T04:27:28+5:302020-12-03T04:27:28+5:30

सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गाडेकर मळा येथील रामजी लालबाबू यादव (वय९) या मुलाला त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या एका युवकाने ...

Murder by strangling a schoolboy | शाळकरी मुलाचा गळा आवळून निघृण खून

शाळकरी मुलाचा गळा आवळून निघृण खून

सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गाडेकर मळा येथील रामजी लालबाबू यादव (वय९) या मुलाला त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या एका युवकाने भाजीपाला आणण्याच्या बनाव करून ओम्नी कारमधून त्याला नाशिकरोडला नेले. नाशिकरोड येथे त्या युवकाचा दुसरा साथीदार कारमध्ये बसला आणि त्यांनी रामजीला खाऊचे प्रलोभन दाखवून कारमध्ये बसवून ठेवले. यावेळी सिन्नर फाटा येथे सिन्नरला जाणाऱ्या एका प्रवाशालाही त्यांनी कारमध्ये बसविले. यानंतर त्यांनी ओम्नी महामार्गाने सिन्नरच्या दिशेने नेण्याऐवजी सामनगाव-एकलहरा रस्त्याने नेली.

यानंतर हल्लेखोरांपैकी रामजीच्या घराशेजारी राहणारा युवक रात्री घरी आला असता मुलाच्या आईवडिलांनी त्याला त्यांचा मुलगा कोठे आहे? असे विचारले असता त्याने ‘मी तुमचा फोन आला तेव्हाच त्याला सायंकाळी घराजवळ आणून सोडले होते’ असे सांगितले. घाबरलेल्या आईवडिलांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार कथन केला. यानंतर पोलिसांनी तत्काळ सिन्नर पोलिसांनाही मुलाचा शोध घेण्याबाबत कळविले आणि दोघा संशयितांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

--इन्फो--

जबरी लुटीचा गुन्हा लपविण्यासाठी मुलाचा आवळला गळा

प्रवासी विजय अनिल आव्हाड (२६, केपानगर, सिन्नर) याने आक्षेप घेत त्यांना इकडे कोणत्या रस्त्याने जात आहे? असे विचारले असता त्यांनी कार एका ऊसशेतीच्या मळे परिसरात उभी करून विजयला मारहाण करत चाकूचा धाक दाखवून त्याचा मोबाइल, चार हजाराची रोकड हिसकावून घेत त्याच्या हातावर चाकूने वार केला. यावेळी पाठीमागून दुसरे वाहन आल्याने य हल्लेखोरांनी विजयला तेथेच सोडून मुलाला घेऊन ओम्नीतून पळ काढला. हा सर्व प्रकार नऊवर्षीय रामजीसमोर घडल्यामुळे संशयित हल्लेखोरांनी या गुन्ह्याची वाच्यता होऊ नये म्हणून मुलाचाही गळा आवळून खून करत त्याचा मृतदेह सिन्नर पोलिसांच्या हद्दीतील डुबेरे गावाच्या शिवारात एका नदीकाठालगत फेकून दिल्याचा पोलिसांना संशय आहे.

Web Title: Murder by strangling a schoolboy