वगरीपाडा येथे एकाचा खून : तांदूळ दिल्याचा राग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:14 IST2021-03-22T04:14:25+5:302021-03-22T04:14:25+5:30

वग्रीपाडा वाठोडा येथील रहिवासी भीमराव उर्फ भिवा विश्वनाथ महाले (४५) व गांधी नगर वाठोडा येथे राहणारे बाबुराव खांडवी ...

Murder of one at Vagripada: Anger over rice | वगरीपाडा येथे एकाचा खून : तांदूळ दिल्याचा राग

वगरीपाडा येथे एकाचा खून : तांदूळ दिल्याचा राग

वग्रीपाडा वाठोडा येथील रहिवासी भीमराव उर्फ भिवा विश्वनाथ महाले (४५) व गांधी नगर वाठोडा येथे राहणारे बाबुराव खांडवी यांच्या घरी गेल्यावर बाबुराव खांडवी यांनी भीमराव महालेच्या तांदळाची गोणी खांद्यावर दिल्या नंतर भीमराव घराच्या बाहेर आल्यावर बाबुराव खांडवी यांचा मुलगा नामदेव खांडवी व पत्नी लीलाबाई खांडवी तेेेथे आल्यावर बाबुराव खांडवी यांना मारहाण केली बाबुराव हे घटनास्थळावरून पळून गेल्यावर भिमराव महालेला काठीनेे व लाथाबुक्यांनी पोटावर व पूर्ण शरीरावर जबर मारहाण केल्याने भीमराव उर्फ भिवा महालेचा मृत्यू झाला. अशी फिर्याद नामदेव भीमराव खांडवी यांनी सटाणा पोलिस स्टेशनमध्ये दिली. भा. द.वि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शाखाली पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड,पोलिस उपनिरीक्षक राहुल गवई करीत आहे.

फोटो २१ : भीमराव महाले

Web Title: Murder of one at Vagripada: Anger over rice