शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लासलगावजवळ शेळी व्यापाऱ्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 22:52 IST

लासलगाव : कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील अल्लाउद्दीन शमशुद्दीन खाटीक (५२) या शेळी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याचा मृतदेह लासलगाव पोलीस कार्यालयाच्या हद्दीतील देवगाव-कानळद रस्त्यावर गुरुवारी (दि. ७) दुपारी झाडाझुडपांजवळ आढळून आला. सदर व्यापाऱ्याचे पाय बांधून खून करत कुणीतरी मृतदेह फेकून दिला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

ठळक मुद्देकोणीतरी खून करून या ठिकाणी मृतदेह फेकून दिला असावा

लासलगाव : कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील अल्लाउद्दीन शमशुद्दीन खाटीक (५२) या शेळी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याचा मृतदेह लासलगाव पोलीस कार्यालयाच्या हद्दीतील देवगाव-कानळद रस्त्यावर गुरुवारी (दि. ७) दुपारी झाडाझुडपांजवळ आढळून आला. सदर व्यापाऱ्याचे पाय बांधून खून करत कुणीतरी मृतदेह फेकून दिला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास रस्त्याच्या लगत अल्लाउद्दीन शमशुद्दीन खाटीक या व्यापाऱ्याचा मृतदेह पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे या व्यापाराचा कोणीतरी खून करून या ठिकाणी मृतदेह फेकून दिला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.घटनेची माहिती समजताच लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, सहायक पोलीस निरीक्षक रामकृष्ण सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ कोठुळे, हवालदार धोक्रट, कैलास महाजन यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी नाशिकच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, निफाडचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ तांबे यांनीदेखील भेट देऊन पाहणी केली. लासलगाव पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवचिकित्सेसाठी पाठविला असून खुनाचे नेमके कारण काय याबाबत पोलीस यंत्रणा तपास करत आहे.सोबत होते बारा लाख रुपयेशेतकरी राजेंद्र रंगनाथ बोचरे यांना दुपारी १२.३० च्या सुमारास मोटारसायकल उभी आढळली. त्यांनी नजीक जाऊन बघितले असता त्यांना शेतात मृतदेह आढळून आला. सदर इसमाचा पाय बांधलेले व गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. अधिक चौकशीअंती तो मृतदेह अल्लाउद्दीन समसुभाई खाटीक यांचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यां सकाळी ते निफाडहुन कानळदकडे येत असताना त्यांच्याकडे १२ लाख रुपयांची रक्कम असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. मृतदेहाची फॉरेन्सिक तपासणी व परिसराची श्वान पथकाने तपासणी केली असून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी निफाड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू