मुरमाचा कडा कोसळून महिलेसह मुलगी ठार

By Admin | Updated: October 18, 2016 02:16 IST2016-10-18T01:52:50+5:302016-10-18T02:16:43+5:30

मुरमाचा कडा कोसळून महिलेसह मुलगी ठार

Murder killed the woman and killed a woman with the woman | मुरमाचा कडा कोसळून महिलेसह मुलगी ठार

मुरमाचा कडा कोसळून महिलेसह मुलगी ठार

घोटी : इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो येथील काही महिला सोमवारी दुपारी अंगण तयार करण्यासाठी गावालगत असलेल्या खाणीत मुरूम आणण्यासाठी गेल्या असताना खोदकाम करताना अचानक मुरुमाचा कडा कोसळल्याने एका महिलेसह बालिका ढिगाऱ्याखाली दबून जागीच ठार झाली, तर तीन महिलांनी प्रसंगावधान राखल्याने सुदैवाने त्या बचावल्या.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात सणापूर्वी घरासमोरील अंगण ओटे तयार करण्यासाठी मुरु म आणण्यासाठी गावातील महिला गावालगतच्या मुरु म खाणीत जातात. त्या ठिकाणी खोदकाम करून मुरु म आणतात. आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास नांदगाव सदो येथील काही महिला गावालगत मुरुम आणण्यासाठी गेल्या असता, मुरु म खोदकाम करताना अचानक मुरु माचा कडा कोसळला. या ढिगाऱ्याखाली दबून रंजनाबाई मारु ती आडोळे (४२) व सोनाली कोंडीराम भागडे (११) या दोघी जागीच ठार झाल्या, तर इंदू मनोहर भागडे, फशाबाई कोंडीराम भागडे (१९) व कौशाबाई हरिश्चंद्र गतीर (४५) या तीन महिलांनी प्रसंगावधान राखून पळ काढल्याने त्या बचावल्या. मात्र यात इंदूबाई या जखमी झाल्या. त्यांनी घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. (वार्ताहर)

Web Title: Murder killed the woman and killed a woman with the woman