पत्नीकडून प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:12 IST2021-07-17T04:12:50+5:302021-07-17T04:12:50+5:30

मृताचा भाऊ दीपक कारभारी ठाकरे (४४, रा. झाडी नेहरु नगर वस्ती) यांनी तालुका पोलिसांत फिर्याद दिली ...

Murder of husband by wife with the help of boyfriend | पत्नीकडून प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

पत्नीकडून प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

मृताचा भाऊ दीपक कारभारी ठाकरे (४४, रा. झाडी नेहरु नगर वस्ती) यांनी तालुका पोलिसांत फिर्याद दिली आहे. मांजरे शिवारात पुंजाराम साळुंके यांच्या शेतास लागून असलेल्या सावकारवाडीकडे जाणाऱ्या पक्क्या डांबरी रस्त्यावर ही घटना ९ जुलैला घडली होती. मृत देवीदास कारभारी ठाकरे (४०, रा. झाडी शिवार, नेहरू वस्ती) याची पत्नी संशयित आरोपी सुनीता ऊर्फ राणी व संशयित आरोपी सागर इंगळे यांचे अनैतिक प्रेमसंबंध होते, असे फिर्यादीत म्हटले आहे. सागर इंगळे व सुनीता देवीदास ठाकरे या दोघांनी मिळून त्यांच्या प्रेमसंबंधात अडथळा नको म्हणून देविदास यांचा गळा आवळून त्यांना जीवे ठार मारून खून केला असावा व कोणास काही समजू नये म्हणून त्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असावा, असा फिर्यादीचा संशय आहे. याप्रकरणी ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली होती परंतु मृताच्या भावाने खुनाचा संशय व्यक्त केल्याने याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपाास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.

Web Title: Murder of husband by wife with the help of boyfriend