Munsare public toilets tank broke | मुंगसरे सार्वजनिक शौचालयाची टाकी फुटली
मुंगसरे सार्वजनिक शौचालयाची टाकी फुटली

मातोरी : मुंगसरे गावातील सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, नागरिकांच्या मागणीकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे .
मुंगसरे गावातील नागरिकांनी प्रत्येक घरात शौचालयाची बांधणी करून घेतली असली तरी कोळीवाडा व शेजारील नागरीवस्तीत जागेअभावी त्यांना स्वत:चे शौचालय नाही. त्यामुळे तेथील नागरिक स्मशानभूमीशेजारील सार्वजनिक शौचालयाचा वापर करीत आहेत.
परंतु हे शौचालय नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरत आहे, शौचालयाची टाकी गेल्या वर्षभरापासून भरलेली असून, त्यातून दुर्गंधी सुटली आहे, तर शौचालयाची टाकी फुटलेली असल्यामुळे रात्री-अपरात्री शौचासाठी अंधारात जाणाऱ्यांच्या जिवावर बेतू शकते. तसेच बाहेर कोणत्याही प्रकारची दिवाबत्तीची सोय नाही. या समस्यांबाबत तक्रार करूनही ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत तातडीने करवाई करण्याची मागणी होत आहे़
शौचालयाच्या टाकीचा स्लॅप तुटला असून, त्यात एक दोन वेळेस कुत्र्याचे पिल्लू पडून मृत पावली आहेत. सदरचा प्रकार धोकेदायक असून, कोणाच्या जिवावर बेतू नये यासाठी अनेकदा दुरुस्तीची मागणी केली, पण गावातील सरपंच व ग्रामसेवक दुर्लक्ष करत आहेत.  - नंदू म्हैसधुणे, स्थानिक नागरिक


Web Title:  Munsare public toilets tank broke
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.