नगरपालिकेचा ठराव : अनेक चौक, रस्त्यांचे नामकरण

By Admin | Updated: August 13, 2014 00:44 IST2014-08-12T22:12:54+5:302014-08-13T00:44:19+5:30

नूतन कार्यालयास राजीव गांधींचे नाव

Municipality resolution: Many chowk, naming of roads | नगरपालिकेचा ठराव : अनेक चौक, रस्त्यांचे नामकरण

नगरपालिकेचा ठराव : अनेक चौक, रस्त्यांचे नामकरण

 सिन्नर : सुमारे पाच कोटी रुपयांच्या निधीतून साकारण्यात आलेल्या नगरपालिकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे ‘राजीव गांधी भवन’ म्हणून नामकरण करण्याचा ठराव नगरपालिकेच्या बैठकीत करण्यात आला.
नगराध्यक्ष आश्विनी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत शहरातील अनेक चौक, नवीन वास्तू व व्यापारी संकुल, शहरातील अनेक रस्ते यांना विविध थोर पुरुषांची नावे देण्याचा ठराव यावेळी करण्यात आला.
नाट्यगृहाच्या इमारतीचे ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे’ असे नामकरण करण्यात आले असून, या नाट्यमंदिरातील रंगमंच महाकवी वामनदादा कर्डक म्हणून,तर कलादालन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले नावाने ओळखले जाणार आहे. हुतात्मा स्मारक हुतात्मा सिव्हीक इनक्लेव्ह, वावीवेस पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर प्रवेशद्वार, वावीवेस चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बसस्थानक चौक महात्मा जोतिबा फुले, अग्निशामक केंद्राची इमारत एकलव्य अग्निशामक भवन, क्रीडा संकुल शिवपुत्र धर्मवीर राजे संभाजी क्रीडा संकुल, पंचायत समिती कार्यालय यशवंत चव्हाण भवन म्हणून ओळखले जाणार आहे. गंगावेस भागातील व्यापारी संकुल लोकनेते गोपिनाथ मुंडे व्यापारी संकुल, सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवीन ग्राहक भांडार राजमाता जिजाऊ महिला बचत गटांचे उत्पादित मालाचे विक्री केंद्र म्हणून उदयास येत आहे, तर शहरातील काही रस्त्यांचे नामकरण पुढीलप्रमाण करण्याचा ठराव बैठकीत करण्यात आला. न्हावी गल्ली-संत गोरोबा काका मार्ग, तानाजी चौक ते कुरणे गल्ली- मौलाना अब्दुल कलाम आझादरोड, आडवा फाटा ते सरदवाडी रोड-क्रांतिवीर वसंतराव नाईक मार्ग, सोनार देवी मंदिर ते चांडक बंगला- संत नरहरी महाराज मार्ग, वावी वेस ते फुले हायस्कूल-स्व. शंकरबाबा लोंढे मार्ग, पडकी वेस ते गणेशपेठ रोड- स्व. हेमंतआबा देशमुख मार्ग, खडकपुरा ते गंगावेस- स्व. विष्णू लाडुजी वंजारी मार्ग, लालचौक ते व्यापारी बॅँक- महालक्ष्मी रोड, खाटीक गल्ली ते बी. जी. क्षत्रिय सायकल दुकान- पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर मार्ग. बैठकीस उपनगराध्यक्ष नामदेव लोंढे, नगरसेवक बापू गोजरे, संजय नवसे, हर्षद देशमुख, मेहमूद दारूवाला, मल्लू पाबळे, राजश्री कपोते, डॉ. प्रतिभा गारे, उज्ज्वला खालकर, लता मुंडे, लता हिले, सुजाता गाडे, मंगला जाधव आदि उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Municipality resolution: Many chowk, naming of roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.