शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

म्युनिसिपल कामगार सेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:21 IST

म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेऊन प्रलंबित मागण्यांवर चर्चा केली. यावेळी ४० मागण्यांचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले. प्रलंबित मागण्यांसंदर्भात महिनाभरात सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास दि. १७ जानेवारी २०१८ पासून ‘काम बंद’ आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी कामगार सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे यांनी दिला.

नाशिक : म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेऊन प्रलंबित मागण्यांवर चर्चा केली. यावेळी ४० मागण्यांचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले. प्रलंबित मागण्यांसंदर्भात महिनाभरात सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास दि. १७ जानेवारी २०१८ पासून ‘काम बंद’ आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी कामगार सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे यांनी दिला.  कामगार सेनेच्या वतीने यावेळी आयुक्तांशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यात प्रामुख्याने, आस्थापना परिशिष्टावरील अधिकारी व कर्मचाºयांना शंभर टक्के पदोन्नती मिळावी, वय वर्षे ४५ची अट व शैक्षणिक अट शिथिल करून कुंठित वेतनश्रेणी देण्यात यावी, वैद्यकीय भत्त्याच्या वाढीसंदर्भात महासभेने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करावी, रिक्त पदे व सफाई कर्मचाºयांची पदे तत्काळ भरावी, गणवेशप्राप्त कर्मचाºयांना स्वेटर, बूट देण्यात यावे, ठेकेदारी पद्धत बंद करावी, हजेरी शेडवर आसन व इतर सुविधा पुरवाव्यात, सफाई कामगारांची दर सहा महिन्यांनी आरोग्य तपासणी करावी, मयत कर्मचाºयांच्या वारसांना तातडीने अनुकंपा तत्त्वावर मनपा सेवेत सामावून घ्यावे, कर्मचाºयांना भविष्य निर्वाह निधीची रक्कम पूर्वीप्रमाणेच मिळावी, सुरक्षा रक्षक व वाहनचालकांच्या रिक्त जागा आउटसोर्सिंगने भरू नयेत, अपंग कर्मचाºयांच्या मागण्यांची पूर्तता करावी, आगामी अंदाजपत्रकात सातवा वेतन आयोग व त्याचा देय असलेल्या फरकाच्या रकमेची तरतूद करावी आदींसह विविध मागण्यांचा समावेश आहे. यावेळी सरचिटणीस सुरेश अहेर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. याचवेळी निवेदन महपौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनाही देण्यात आले. डिसेंबरअखेर बैठक म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याशी चर्चा केल्यानंतर आयुक्तांनी कर्मचाºयांच्या विविध मागण्यांप्रश्नी डिसेंबरअखेर बैठक घेण्याचे आश्वासित केले. प्रशासनाने महिनाभरात मागण्यांची पूर्तता न केल्यास ‘काम बंद’ आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक