मनपा शाळा क्र. ८ मधील विद्यार्थ्यांचे यश

By Admin | Updated: July 26, 2014 00:53 IST2014-07-26T00:18:17+5:302014-07-26T00:53:52+5:30

मनपा शाळा क्र. ८ मधील विद्यार्थ्यांचे यश

Municipal school no. The success of the students of 8 | मनपा शाळा क्र. ८ मधील विद्यार्थ्यांचे यश

मनपा शाळा क्र. ८ मधील विद्यार्थ्यांचे यश

सातपूर : येथील महापालिका विद्यानिकेतन शाळा क्रमांक ८ मधील इयत्ता चौथी आणि सातवीचे दहा विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकले असून, गुणवत्ता यादीत येण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
मनपा शाळा क्रमांक ८ मधील यावर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत चौथीतील मानसी उमेश बोरसे व वैभवी महेश बोरसे, तर इयत्ता सातवीचे रेहान चाउस, नुरसुब पिंजारी, हिम्मत पावरा, प्रसाद चव्हाण, कौशल्या सोनवणे, गणेश थोरात, सई देशमुख, वैष्णवी देवरे आदि विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक कैलास ठाकरे, प्रकाश शेवाळे तसेच दीपाली काळे, ज्योती गर्दे, पुनाजी मुठे, सुरेश चौरे, भास्कर राठोड, पल्लवी भुसे, उज्ज्वला एखंडे आदि शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Municipal school no. The success of the students of 8