महापालिकेचे पंपिंग स्टेशन धोक्यात
By Admin | Updated: July 19, 2014 21:16 IST2014-07-18T22:01:13+5:302014-07-19T21:16:20+5:30
मालेगाव : येथील बजरंगवाडी परिसरात मोसम नदीपात्रात जेसीबी व पोकलँड यंत्राच्या साहाय्याने पुन्हा मातीचा उपसा करण्यात येत आहे.

महापालिकेचे पंपिंग स्टेशन धोक्यात
मालेगाव : येथील बजरंगवाडी परिसरात मोसम नदीपात्रात जेसीबी व पोकलँड यंत्राच्या साहाय्याने पुन्हा मातीचा उपसा करण्यात येत आहे. त्यामुळे मोसम नदीबरोबरच महापालिकेच्या पंपिंग स्टेशनचे व स्मशानभूमीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ही माती परिसरात खासगी जमिनीच्या सपाटीकरणासाठी वापरली जात आहे. नदीपात्रात माती उपसा पुन्हा सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
शहराच्या मध्यातून वाहणाऱ्या मोसम नदीपात्रात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पोकलँड यंत्राच्या साहाय्याने माती काढून वाहनात भरली जात आहे. राज्यात शासनाने गौण खनिजावर कायद्याने बंदी असताना या कायद्याची सर्रास पायमल्ली होत आहे.
शहरातून वाहणाऱ्या मोसम नदीपात्रात गेल्या दोन महिन्यांपासून जेसीबी व पोकलँड यंत्राच्या साहाय्याने बेकायदेशीरपणे माती कोरली जात होती. मात्र गेल्या पाच ते सात दिवसांपासून पुन्हा या भागात माती कोरण्यात येत आहे.ही कोरलेली माती डंपरच्या साहाय्याने रावण दहन मैदाना-शेजारील खासगी जमिनीच्या सपाटी -करणासाठी वापरली जात आहे.