धोकादायक इमारतींबाबत मनपा उदासीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:50 IST2019-08-01T00:50:27+5:302019-08-01T00:50:43+5:30
मालेगाव : राज्यात धोकादायक इमारती कोसळून निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे, असे असताना मालेगाव महापालिका धोकादायक इमारत मालकांवर कारवाई करण्याचे धारिष्ट्य दाखवित नसल्याचे समोर आले आहे. केवळ नोटीस बजावून महापालिका प्रशासन धन्यता मानत आहे.

धोकादायक इमारतींबाबत मनपा उदासीन
अतुल शेवाळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : राज्यात धोकादायक इमारती कोसळून निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे, असे असताना मालेगाव महापालिका धोकादायक इमारत मालकांवर कारवाई करण्याचे धारिष्ट्य दाखवित नसल्याचे समोर आले आहे. केवळ नोटीस बजावून महापालिका प्रशासन धन्यता मानत आहे. खासगी धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करायचे कोणी, असा प्रश्न महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित करून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे, तर शहरात आठ हजार ६५२ अनधिकृतरीत्या बांधकामे झाली आहेत. संबंधितानी बांधकाम परवानगी न घेता महापालिकेचा महसूल बुडविला आहे.
शहरात १५ अतिधोकादायक, १४४ इमारती राहण्यायोग्य नाहीत तर ३३ इमारतींची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. अशा १९२ इमारती महापालिकेच्या नगररचना विभागाने धोकेदायक ठरविल्या आहेत. 192
इमारती धोकादायक असल्याची नोंद मनपाकडे आहे. मात्र स्ट्रक्चरल आॅडिटचा खर्च कुणी करायचा, या विषयावरून महापालिकेच्या नगररचना, बांधकाम विभागाच्या व प्रभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांमध्ये असमन्वय दिसून येत आहे.तज्ज्ञ काय म्हणतात?
मुंबई व इतर शहरांमध्ये धोकादायक इमारती कोसळून दुर्घटना घडल्या आहेत. मालेगाव महापालिकेने मोडकळीस आलेल्या इमारतींवर नियमाप्रमाणे कारवाई करावी. धोकादायक इमारती निष्कासित कराव्यात. धोकादायक इमारती खाली करणे गरजेचे आहे.
- कुंदन चव्हाण, अभियंतामहापालिकेची भूमिका
महापालिकेच्या चारही प्रभागांतील धोकादायक इमारत मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. भविष्यात पोलिसांच्या मदतीने धोकादायक इमारती खाली करून घेण्यात येतील. तसेच इमारती पाडण्याची कारवाई केली जाणार आहे. नगररचना व बांधकाम विभागाला, प्रभाग अधिकाºयांना सूचना देण्यात आल्या आहेत.
- किशोर बोर्डे, मनपा आयुक्तधोकादायक इमारती ठरतील जीवघेण्या
सध्या शहर परिसरात पाऊस सुरू आहे. महापालिकेची धोकादायक इमारतींबाबत उदासीन भूमिका दिसून येत आहे. केवळ धोकादायक खासगी इमारतींचे प्रभागनिहाय सर्वेक्षण करून नोंद घेण्यात आली आहे व इमारत मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र ठोस कारवाई केली जात नाही दुर्दैवी घटना घडल्यानंतरच मनपाला जाग येईल का?