मनपा कर्मचाऱ्यांना हवे १७ हजार ५०० सानुग्रह अनुदान

By Admin | Updated: October 6, 2016 01:05 IST2016-10-06T00:49:03+5:302016-10-06T01:05:46+5:30

मनपा कर्मचाऱ्यांना हवे १७ हजार ५०० सानुग्रह अनुदान

Municipal employees want 17,500 ex-gratia grant | मनपा कर्मचाऱ्यांना हवे १७ हजार ५०० सानुग्रह अनुदान

मनपा कर्मचाऱ्यांना हवे १७ हजार ५०० सानुग्रह अनुदान

नाशिक : आॅक्टोबरच्या अखेरच्या सप्ताहात येणाऱ्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी यंदा वाढती महागाई लक्षात घेता १७ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेने आयुक्तांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
कामगार सेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, महापालिकेतील एकत्रित वेतनावरील कर्मचारी, प्राथमिक शिक्षक व रोजंदारी कर्मचारी, मानधनावरील कर्मचारी व शिक्षक, अंगणवाडी मुख्यसेविका, सेविका, मदतनीस, अंशकालीन शिक्षिका व शिक्षण मंडळातील सर्व कर्मचारी, सुरक्षा रक्षक, मनपा क्षयरोग नियंत्रण सोसायटीतील कर्मचारी, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातील कर्मचारी, आरसीएच प्रकल्पातील कर्मचाऱ्यांना महागाई निर्देशांकात झालेली वाढ लक्षात घेता दीपावली सणानिमित्त १७ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान द्यावे व सदर रक्कम दीपावलीपूर्वी १५ दिवस अगोदर द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
स्थायी समितीने सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रकात कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानासाठी १० कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचेही कामगार सेनेने निवेदनात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Municipal employees want 17,500 ex-gratia grant