महामार्ग हस्तांतरणास महापालिकेचा नकार

By Admin | Updated: April 2, 2017 02:12 IST2017-04-02T02:11:57+5:302017-04-02T02:12:12+5:30

नाशिक : नाशिक महापालिकेचा मात्र महामार्ग हस्तांतरणाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे आणि महापालिकेला आर्थिकदृष्ट्या ते शक्यही नसल्याचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी स्पष्ट केले आहे.

Municipal Corporation rejects highway transfer | महामार्ग हस्तांतरणास महापालिकेचा नकार

महामार्ग हस्तांतरणास महापालिकेचा नकार

 नाशिक : शहरातून जाणारे राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांचे हस्तांतरण स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरित करण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरू असल्या तरी नाशिक महापालिकेचा मात्र महामार्ग हस्तांतरणाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे आणि महापालिकेला आर्थिकदृष्ट्या ते शक्यही नसल्याचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, ज्या प्रस्तावावर हस्तांतरणाची चर्चा सुरू झाली तो जळगावच्या भूतपूर्व नगरपालिकेने सन २००२ मध्येच शासनाला पाठविल्याचे आणि तब्बल १५ वर्षांनंतर पुनर्जीवित करण्यात आल्याचे वास्तवही समोर आले आहे.
राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील पाचशे मीटर अंतरावर मद्यविक्रीची दुकाने १ एप्रिल २०१७ पासून बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे महामार्गावरील दारूविक्री थांबणार आहे.

Web Title: Municipal Corporation rejects highway transfer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.