शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

महापालिका : उद्यान अधीक्षकाचा प्रस्ताव शासनाकडे उद्यान देखभालीत कुचराई; ठेका रद्द करण्याची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 1:15 AM

महापालिकेने उद्याने देखभालीसाठी दिलेल्या ठेकेदारांच्या कामकाजात सुधारणा न झाल्यास संबंधितांचा ठेकाच रद्द करण्यात येणार असल्याचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

नाशिक : महापालिकेने उद्याने देखभालीसाठी दिलेल्या ठेकेदारांच्या कामकाजात सुधारणा न झाल्यास संबंधितांचा ठेकाच रद्द करण्यात येणार असल्याचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे. दरम्यान, उद्यान विभागाचा तात्पुरता कार्यभार एस. एस. रौंदळ यांच्याकडे सोपविण्यात आला असून, उद्यान अधीक्षकाचे पद प्रतिनियुक्तीवर भरण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याचेही आयुक्तांनी म्हटले आहे.उद्यान विभागाला पश्चिम प्रभागाच्या सभापती डॉ. हेमलता पाटील यांनी टाळे ठोकल्यानंतर त्याबाबत आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त आणि उद्यान अधीक्षकाशी चर्चा केली. उद्यान विभागाच्या एकूणच कामकाजाबद्दल नंतर आयुक्तांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, उद्यान विभागासाठी मुळातच कर्मचारीवर्ग अपुरा आहे. त्यामुळे उद्यान विभागासाठी अन्य विभागांतून काही कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. जी उद्याने देखभालीसाठी ठेकेदारांकडे देण्यात आलेली आहेत, त्यांचा आढावा घेण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त रमेश पवार आणि उद्यान अधीक्षक यांना देण्यात आल्या आहेत. त्यात जे ठेकेदार काम करत नसतील त्यांचा ठेका रद्द करण्यात येईल. मी स्वत: प्रभागांमध्ये दौरा करत असताना काही ठिकाणी उद्यानांचे काम समाधानकारक वाटले परंतु काही उद्यानांची स्थिती खराब दिसून आली आहे. त्यानुसार, संबंधितांना नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या. परंतु, नोटिसा बजावूनही कामात सुधारणा होत नसेल तर ठेका रद्द केला जाईल, असेही आयुक्तांनी सांगितले. दरम्यान, डॉ. पाटील यांनी टाळे लावण्यापूर्वी आयुक्तांशी या विषयावर चर्चा करायला हवी होती. त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न गंभीरच आहे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.