विसर्जनासाठी मनपा केंद्राला पसंती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:14 IST2021-09-13T04:14:35+5:302021-09-13T04:14:35+5:30

नाशिक : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नाशिक महापालिकेने कंबर कसली असून, त्या दृष्टीने गणेश विसर्जनामुळे होणारे नदीचे तसेच पर्यावरणाचे ...

Municipal Corporation preferred for immersion! | विसर्जनासाठी मनपा केंद्राला पसंती !

विसर्जनासाठी मनपा केंद्राला पसंती !

नाशिक : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नाशिक महापालिकेने कंबर कसली असून, त्या दृष्टीने गणेश विसर्जनामुळे होणारे नदीचे तसेच पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी नाशिक मनपातर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर दीड आणि तीन दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी नागरिकांकडून मनपाच्या मूर्ती संकलन केंद्रास पसंती दिली जात आहे.

शहरात दीड दिवसांच्या आणि तीन दिवसांच्या गणेश विसर्जनानिमित्त मनपाच्या आवाहनास प्रतिसाद देत तब्बल ३६९ नागरिकांनी त्यांच्या घरगुती गणेशाचे विसर्जन नदीपात्रात न करता मनपाच्या गणेशमूर्ती संकलन केंद्रांवर मूर्ती जमा केल्या व मनपाच्या पर्यावरण संवर्धन मोहिमेस हातभार लावला. तसेच यापुढील ५, ७ व १० व्या दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन करणाऱ्या नागरिकांना मनपातर्फे आवाहन करण्यात आले आहे . नागरिकांनी अधिकाधिक प्रमाणात त्यांच्या गणेशमूर्ती मनपाच्या संकलन केंद्रांवर जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Municipal Corporation preferred for immersion!