महानगरपालिका आज करणार तीन हजार वृक्षांची लागवड

By Admin | Updated: July 1, 2016 00:25 IST2016-06-30T23:58:22+5:302016-07-01T00:25:27+5:30

वनमहोत्सव : सहाही विभागांत उपक्रम

Municipal Corporation to plant three thousand trees today | महानगरपालिका आज करणार तीन हजार वृक्षांची लागवड

महानगरपालिका आज करणार तीन हजार वृक्षांची लागवड

नाशिक : राज्य शासनाच्या वनमहोत्सवांतर्गत नाशिक महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी (दि.१ जुलै) शहरातील सहाही विभागात २५ ठिकाणी तीन हजार वृक्षांचे रोपण करण्यात येणार असून, वृक्षारोपणाचा मुख्य सोहळा सायंकाळी ५.३० वाजता गंगापूररोडवरील आकाशवाणी टॉवरजवळील जॉगिंंग ट्रॅक याठिकाणी होणार आहे.
शासनाच्या वनमहोत्सवांतर्गत महापालिकेनेही शहरात वृक्षलागवडीचा उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे. सिडको विभागात पाटीलनगर क्रीडांगण, महाकाली क्रीडांगण, खुटवडनगर येथील माहेरघर मंगल कार्यालयाच्या बाजूची मोकळी जागा, दत्तनगरमधील मनपा शाळा क्रमांक १३०, रामनगर मैदान, कर्मयोगीनगर येथील खुली जागा, सातपूर विभागात विस्डम हायस्कूलसमोर, वसंत कानेटकर उद्यानाबाहेर, रामेश्वरनगरातील खुली जागा, चेहेडी मैदान, मराठा कॉलनी, केरू पाटीलनगरातील राधेश्याम सोसायटी, गोसावीनगर, मॉडेल कॉलनी परिसर, पंचवटी विभागात पंचवटी महाविद्यालयासमोरील जागा, श्रीरामनगर, गायत्रीनगर, गणेशनगर, मनपा शाळा म्हसरूळ, नाशिक पूर्व विभागातील टाकळी गाव मलनिस्सारण केंद्र आणि नाशिक पश्चिम विभागात मातोश्रीनगर, गायकवाडनगर, बी. डी. भालेकर हायस्कूल आणि आकाशवाणी टॉवरजवळील जॉगिंग ट्रॅक याठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यावेळी परिसरातील स्थानिक नागरिकांनाही सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Municipal Corporation to plant three thousand trees today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.