त्र्यंबकेश्वरच्या दलित वस्तीकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 17:51 IST2019-11-24T17:48:59+5:302019-11-24T17:51:36+5:30
त्र्यंबकेश्वर : शहरातील दलित वस्तीतील स्वच्छता गृहाबाबत यापुर्वी अनेक वेळा तक्र ारी करु नही त्र्यंबक नगरपरिषद दुर्लक्ष करीत असल्याचे डॉ. आंबेडकर नगरातील नागरिकांचे मत आहे.

त्र्यंबकेश्वरच्या दलित वस्तीकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष !
त्र्यंबकेश्वर : शहरातील दलित वस्तीतील स्वच्छता गृहाबाबत यापुर्वी अनेक वेळा तक्र ारी करु नही त्र्यंबक नगरपरिषद दुर्लक्ष करीत असल्याचे डॉ. आंबेडकर नगरातील नागरिकांचे मत आहे.
येथील दलित वस्तीत दोन स्वच्छता गृहे असुन यापैकी जे जुने (१९५६ मध्ये बांधलेले) आहे. हल्ली हे स्वच्छता गृह नादुरु स्त असुन त्यावरील स्लॅब केव्हा कोसळेल याचा भरवसा नाही. चारही (२ जेन्ट्स व २ लेडीज) खोल्यांना दरवाजे नाहीत. चारही खोल्यांचे भांडे नाहीत.सर्वत्र घाणीचे अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. या स्वच्छता गृहा भोवती जंगली वनस्पती काटेकुटे गवताने वेढलेले आहे. पण नगरपरिषदेला जाग येत नाही
ही झाली स्वच्छता गृहाची कैफीयत ! नुकतेच उमेश सोनवणे यांच्या तक्र ारी वरु न येथे असलेल्या उद्यानाची साफ सफाई केल्याने ही तक्र ार दुर झाली पण हे उद्यान नाहीच. कारण येथे एकही झाड अथवा फुलझाड नाही. येथे फक्त लहान मुलांसाठी खेळणी बसविण्यात आली होती.
पण आज या खेळण्यांची काय अवस्था आहे. बहुतेक खेळणी तुटली असुन त्यांचा वापर करता येत नाही. येथील खेळणी दुरु स्तीच्या अवस्थेत नाहीत. तर तुटलेली सर्व खेळणी नव्याने बसवुन अजुन महिला वर्गासाठी ग्रीन जिमचे साहित्य बसवावे. अशी येथील महिला वर्गाची मागणी आहे.
तर येथील भारतरत्न डा बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहाची सुंदर इमारत आहे. पण पावसाळ्यात पावसाचे शिंतोडे तथा वसाडे आतमध्ये येतात. या बिल्डींगला काचेच्या खिडक्या असल्या तरी पुरेशा नाहीत. पायऱ्या अपुर्ण आहेत. लोकांना बसण्यासाठी ओटे असावेत.
नुकतेच ही इमारत दुरु स्तीचे सर्वक्षण करण्यात आले. दुरु स्तीचे सर्वेक्षण करणाºया इंजिनिअरला दुरु स्ती करु न द्या. पण त्यांनी असे काही करता येणार नाही आम्हाला तुम्ही सांगायचे नाही. असे येथील नागरिकांना सुनावले.