राज्य सरकारकडून महापालिकेची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:17 IST2021-06-09T04:17:21+5:302021-06-09T04:17:21+5:30

नाशिक- गेल्या दीड वर्षांपासून कोराेना संकटाचा सामना करताना देखील शहरात विविध प्रकल्प राबवले. मात्र आर्थिक अडचण उभी राहिली. सुमारे ...

Municipal conundrum from the state government | राज्य सरकारकडून महापालिकेची कोंडी

राज्य सरकारकडून महापालिकेची कोंडी

नाशिक- गेल्या दीड वर्षांपासून कोराेना संकटाचा सामना करताना देखील शहरात विविध प्रकल्प राबवले. मात्र आर्थिक अडचण उभी राहिली. सुमारे चारशे कोटींचे उत्पन्न घटले. परंतु राज्य शासनाकडून मदत तर नाहीच उलट कर्ज उभारणी, नोकरभरती अशा सर्वच बाबतीत अडवणूक करून कोंडी केली जात असल्याची भावना महापौर सतीश कुलकर्णी यांनी व्यक्त केली. मात्र, प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत देखील नाशिकच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील कोरोना बाधितांवर उपचार याच शहरात होऊ शकले, कोरोनाचा सक्षमतेने लढा हेदेखील आतापर्यंतचे फलित असल्याचे महापौर म्हणाले.

नाशिक लाेकमतच्या रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त सोमवारी (दि. ७) लोकमतशी साधलेल्या संवादात त्यांनी दिलाखुलास मते मांडली. तसेच कारकिर्दीत सुरू असलेल्या अडचणींवर मात करून देखील आगामी निवडणुकांना तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले. लोकमतचे कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी आणि सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला.

महापालिकेत महापौरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांतच कोरोनाचे संकट उद्‌भवले. त्यामुळे गेल्या दीड वर्षात अनेक अडचणी आल्या. परंतु त्यावर मात करून देखील महापालिकेची बससेवा सुरू होत आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत काही चांगली कामे उभी राहिली आहेत. बऱ्याच नव्या प्रकल्पांची पायाभरणी हात आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणी आहेत, असे महापौरांनी स्पष्ट केले.

नाशिक महापालिकेचे चारशे कोटी रुपयांचे उत्पन्न घटले आहे. मात्र, त्याची भरपाई राज्य शासनाकडून अपेक्षित असून देखील उपयोग होत नाही. निवडणुका तोंडावर असल्याने सर्वांनाच प्रभागातील कामे व्हावीत, अशी इच्छा असल्याने नाशिकचे दळणवळण सुलभ व्हावे, यासाठी १९९३ मध्ये पहिल्या विकास आराखड्यात मंजूर असलेले रस्ते व्हावेत, यासाठी कर्ज काढण्याची गरज आहे. क्रिसील या संस्थेने महापालिकेचे पतमापन करून ३०० कोटी रुपयांची कर्ज काढता येतील, असे स्पष्ट केले आहेत. मात्र, आयुक्त टाळत आहेत. शेवटी आयुक्त शासनाचे प्रतिनिधी आहेत. राज्यात दुसऱ्या पक्षाची सत्ता आणि महापालिकेत दुसऱ्या पक्षाची सत्ता असल्याने कोंडी केली जात आहे, असा आरोप त्यांनी केला. महापालिकेत रिक्त पदे भरण्यास मान्यता अर्धवट दिली. मात्र, आकृतीबंध मंजुरीची आणि खर्चाची अट घातली, अशा अनेक प्रकारातून अडचणीत आणण्याचे काम सुरू आहे, असेही महापौर म्हणाले.

इन्फो..

आदित्य ठाकरे यांनी केला फोन...

महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय आणि बिटको रुग्णालयात कोरोना बाधितांवर अत्यंत चांगल्या पद्धतीने उपचार करण्यात आले. ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा पुरवठाही सुरळीत होता. त्यामुळेच तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील आयुक्तांना दूरध्वनी करून एका रुग्णाला बिटको रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी शिफारस केल्याचे महापौरांनी सांगितले.

इन्फो...

दत्तक पित्याने नाशिककरांना हे दिले..

- नाशिकमध्ये १८ नवे जलकुंभ

- मुकणे धरणातून जलवाहिनी योजना पूर्ण

- अडीचशे कोटींचे नवीन रस्ते

- बससेवा दृष्टिक्षेपात

- मेट्रो सेवेलाही मंजुरी

Web Title: Municipal conundrum from the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.