शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका ठेकेदारांची की नागरिकांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:18 IST

पूर्व प्रभागात नगरसेवकांनी नागरिकांची सांगितलेली कामे अधिकारी करीत नसतील तर प्रभाग सभा बंद करा, अशी मागणी करून प्रभाग समितीच्या सभेत प्रशासनाला धारेवर धरले.

इंदिरानगर : पूर्व प्रभागात नगरसेवकांनी नागरिकांची सांगितलेली कामे अधिकारी करीत नसतील तर प्रभाग सभा बंद करा, अशी मागणी करून प्रभाग समितीच्या सभेत प्रशासनाला धारेवर धरले.पूर्व प्रभाग समितीच्या सभापती सुमन भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी सभा झाली. सभा सुरू होताच, मागील सभेत मांडलेल्या समस्या अद्यापही सुटल्या नाहीत. प्रभागातील कामे सांगूनही होत नसेल तर सभा बंद करा, अशी मागणी समीना मेमन यांनी केली. आम्ही नागरिकांच्या समस्या पोटतिडकीने माडतो तरीही कामे होत नसतील तर सभेला येऊन उपयोग काय? असा सवाल करून मनपा ठेकेदारांसाठी आहे की, नागरिकांसाठी याचा खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणी अ‍ॅड. श्याम बडोदे यांनी केली तसेच प्रभाग क्रमांक ३० मध्ये अद्यापि पाणीप्रश्न सुटला नाही, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियोजनाअभावी कृत्रिम पाणीटंचाईस नागरिकांना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.गेल्या सभेत येथील विभागीय कार्यालयाचा इमारतीचा काही भाग ढासळल्याने दोन सदस्यांनी सभात्याग केला होता तरीही आज पुन्हा त्याच ठिकाणी सभा घेण्यात आली अशा इमारतीतच श्रींची स्थापना कशी करतात, असा प्रश्न अ‍ॅड. श्यामला दीक्षित व अ‍ॅड. अजिंक्य साने यांनी केला.सूचितानगर परिसरात अद्यापपर्यंत स्वच्छता कर्मचारी फिरकला नसल्याची तक्रार दीक्षित यांनी केली. वडाळागाव व इंदिरानगर परिसरात गढूळ व दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार सुप्रिया खोडे यांनी केली. डासांचा प्रादुर्भाव वाढला तरीही मलेरिया विभागाकडून धूर फवारणी होत नाही, तक्रार केली तरच फवारणी होत असल्याची तक्रार सुषमा पगारे यांनी केली. जलशुद्धीकरण केंद्रात कामे होतात की नाही, असा प्रश्न विचारून रूपाली निकुळे यांनी प्रभागात अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार केली.सर्वांना यावेळी सुमारे एक कोटी साठ लाख रुपये निधीतून विविध विकासकामांना मंजुरी दिली....तर सभा घेणे बंद करायावेळी सर्व सदस्यांनी नागरिकांची कामे होत नसेल तर सभा घेणे बंद करा, असे म्हणत प्रशासनाला धारेवर धरले. उपमहापौर प्रथमेश गिते व सभागृह नेता सतीश सोनवणे यांनी अधिकाऱ्यांना सदस्यांनी तातडीने कामे करण्याच्या सूचना केल्या.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक