शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

वायुप्रदूषण कमी करण्यासाठी मनपाची समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 01:39 IST

शहरातील वायुप्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठविलेला आराखडा मंजूर झाल्यानंतर आता त्याच्या अंमलबजावणीसाठी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून, लवकरच या समितीची पहिली बैठक होणार आहे.

नाशिक : शहरातील वायुप्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठविलेला आराखडा मंजूर झाल्यानंतर आता त्याच्या अंमलबजावणीसाठी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून, लवकरच या समितीची पहिली बैठक होणार आहे.देशात नव्हे तर जगात राजधानी दिल्लीचा प्रश्न गाजत आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरात वायुप्रदुषण होऊ नये यासाठी केंद्र शासनाने देशभरातून काही शहरे निवडली असून, राज्यात एकूण १८ शहरे आहेत. त्यानंतर या शहरांमधील प्रदूषण कमी व्हावे यासाठी या शहरांना आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार महापालिकेने तयार केलेला आराखडा राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला होता. तो महिनाभरापूर्वीच मंजूर झाला असून, आता या आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरुवात करण्यात येणार आहे.आराखड्याच्या अंमल बजावणीसाठी शासनाच्या निर्देशानुसार समिती गठित करण्यात आली आहे. यात महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे हे समितीचे अध्यक्ष असतील तर राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी हे सदस्य सचिव असतील. याशिवाय या समितीत पोलीस अधिकारी, आरटीओ अधिकारी यांचादेखील समावेश करण्यात आला आहे. लवकरच या समितीची बैठक होणार आहे.शहरातील वायू प्रदूषणाला वेळीच आळा घालण्याबरोबरच व्यापक जनजागृती करण्याचा समितीचा प्रमुख उद्देश असणारआहे.अनेक उपाययोजनांचा समावेशशहरातील वायुप्रदूषण थांबविण्यासाठी आराखड्यात अनेक उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात शहरात हरित पट्टे तयार करणे, वायुप्रदूषण करणाºया मोटारींवर कारवाई करणे यांसह अन्य उपायांचा समावेश आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाpollutionप्रदूषण