शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

स्वच्छ शहरासाठी मनपाचा नागरिकांना दंडाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:30 IST

केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणांतर्गत अद्याप एकदाही पहिल्या दहात येऊ न शकणाऱ्या महापालिकेने यंदा जोरदार तयारी आरंभली असली तरी त्यासाठी नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादापेक्षा दंडावर भर दिला असून, तसे जाहीर प्रकटनच केले आहे.

नाशिक : केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणांतर्गत अद्याप एकदाही पहिल्या दहात येऊ न शकणाऱ्या महापालिकेने यंदा जोरदार तयारी आरंभली असली तरी त्यासाठी नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादापेक्षा दंडावर भर दिला असून, तसे जाहीर प्रकटनच केले आहे. त्यानुसार रस्त्यावर अस्वच्छता करणाऱ्यांना दंड करण्याबरोबरच कचरा किंवा बांधकाम साहित्य सार्वजनिक ठिकाणी टाकला तर दंड करण्यात येणार आहे.विशेष म्हणजे गेल्यावर्षी महापालिकेची गुणांकनात जी घसरण झाली होती त्यात सर्वात कमी गुण हे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य सेवा बेंच मार्कनुसार नसल्याचे स्पष्ट करीत होते. परंतु आता मात्र महापालिकेने सेवेतील सुधारणांपेक्षा नागरिकांवर दंडुका उभारण्यावर भर दिला आहे.केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर योजनेअंतर्गत गेल्यावर्षी देशभरातील सुमारे पाच हजार शहरे सहभागी झाली होती. त्यात नाशिक महापालिकेचा क्रमांक ६७वा आला होता. त्याआधी हा क्रमांक ६३वा होता. मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतल्याने नाशिककरांचा टॉप टेनमध्ये क्रमांक आला नसल्याने मोठी नामुष्की आली होती. आता पुन्हा २०२० साठी सर्वेक्षण होणार आहे. साधारणत: जानेवारी महिन्यात सर्वेक्षण होत असले तरी महापालिका आत्ताच कामाला लागली आहे. त्यासाठी शहरातील भिंती रंगविण्याबरोबरच फलक लावले जात आहेत.स्वच्छ शहर सर्वेक्षणात बाजी मारण्यासाठी महापालिकेत बैठकींचा धडाका सुरू असून, त्यापलीकडे जाऊन आता स्वच्छतेसाठी नागरिकांवर भर देतानाच त्यांना प्रवृत्त करण्यासाठी थेट दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यानुसार विघटनशील व अविघटनशील घरगुती धोकादायक असा वर्गीकृत केलेला कचरा हा महापालिकेने प्राधिकृत केलेली व्यक्ती किंवा एजन्सीकडेच देणे बंधनकारक आहे. तथापि, अन्यत्र कोठेही कचरा फेकल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे. याशिवाय नागरिकांनी वैयक्तिक शौचालयातील सेप्टीक टॅँकमधील मलजल हे कोठेही उघड्यावर नालीत, नदीपात्रात भरू नये अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे...तर नागरिकांना होणार असा दंडपालापाचोळा, प्लॅस्टिक कचरा, रबर जाळणे - ५ हजार रुपयेकचरा जाळणे (मोठ्या प्रमाणात) - २५ हजार रुपयेसार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे - १० हजार रुपयेसार्वजनिक मैला उघड्यावर टाकणे - ५ हजार रुपयेरस्ते- मार्गावर घाण करणे - १८० रुपयेसार्वजनिक ठिकाणी थुंकणे - १५० रुपयेउघड्यावर लघुशंका करणे - २०० रुपयेउघड्यावर शौच करणे - ५०० रुपयेविलगीकरण न केलेला कचरा सोपविल्यास - ३०० रुपये

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान