शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

महापालिकेचे अंदाजपत्रक आज सादर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 01:24 IST

महापालिकेचे सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक गुरुवारी (दि.२१) आयुक्त स्थायी समितीला सादर करणार असून, गेल्यावर्षी करवाढीवरून झालेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन काय प्रस्ताव सुचविते आणि भांडवली कामांसाठी किती निधी उपलब्ध करून देते याकडे पालिका वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

नाशिक : महापालिकेचे सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक गुरुवारी (दि.२१) आयुक्त स्थायी समितीला सादर करणार असून, गेल्यावर्षी करवाढीवरून झालेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन काय प्रस्ताव सुचविते आणि भांडवली कामांसाठी किती निधी उपलब्ध करून देते याकडे पालिका वर्तुळाचे लक्ष लागून आहे.महापालिकेचे अंदाजपत्रक जानेवारी महिन्यातच सादर होणे अपेक्षित होते, परंतु आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नव्यानेच सूत्रे स्वीकारली होती त्याच मुख्य लेखापाल यांच्या रजेमुळे ते विलंबाने म्हणजेच २१ फेबु्रवारीस सकाळी ११ वाजता स्थायी समितीला सादर करणार आहेत. सभापती हिमगौरी आडके यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.  गेल्यावर्षी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करवाढ सुचवणारे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यानंतर त्यांनी सुचवलेली अपेक्षित करवाढ न झाल्याने त्यांनी वार्षिक भाडेमूल्यात भरीव वाढ केली तसेच मोकळ्या भूखंडावर वाहनतळापासून शेतीपर्यंत सर्वच ठिकाणी कर लागू केले होते. त्यामुळे वर्षभर पालिकेत वाद गाजत राहिला. त्यातच मुंढे यांनी २५७ कोटी रुपयांची रस्त्याची कामे रद्द केली आणि अगोदर मंजूर असलेली तसेच अगदी निविदा काढलेलीदेखील भांडवली कामे रद्द केल्याने वादाची जोड मिळाली होती. आर्थिक उपलब्धता, तांत्रिक व्यवहार्यता आणि कामाची गरज अशी त्रिसूत्री त्यांनी राबविल्याने शेकडो कामे रद्द ठरली.त्यामुळे नगरसेवकांत खदखद होती. मुंढे यांच्या बदलीनंतर कर आकारणीत अंशत: दिलासा मिळाला आहे, परंतु त्याचबरोबर आता नवे आयुक्त भांडवली कामांसाठी किती निधी उपलब्ध करून गेल्या वर्षीचा अनुशेष भरून काढतात याकडे नगरसेवकांचे लक्ष लागून आहे.गेल्याच वर्षी घरपट्टी आणि नवीन मिळकतींना वार्षिक भाडेमूल्य वाढ करण्यात आल्याने प्रशासनाच्या वतीने नव्याने मिळकत कर किंवा पाणीपट्टीत आता वाढ सुचवली जाण्याची शक्यता जवळपास नगण्यच आहे. तथापि, जाहिरात करात वाढ होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले तसेच मनपाच्या मिळकतींना रेडीरेकनरच्या अडीच टक्के वाढ दिली जाऊ शकते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक