शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मुंढे यांच्याकडून ‘सुलभ’ची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 00:19 IST

महापालिकेने सुलभ इंटरनॅशनलला देखभाल दुरुस्तीसाठी दिलेली तब्बल ३६ शौचालये जागेवरून गायब झाली असल्याचे आढळून आले आहे. ‘लोकमत’ने शौचालये चोरी प्रकरण प्रसिद्ध केल्यानंतर महापालिकेत दाखल झालेल्या ‘सुलभ’च्या अधिकाऱ्यांची आयुक्त तुकाराम मुंढे यांनी झाडाझडती घेतली.

नाशिक : महापालिकेने सुलभ इंटरनॅशनलला देखभाल दुरुस्तीसाठी दिलेली तब्बल ३६ शौचालये जागेवरून गायब झाली असल्याचे आढळून आले आहे. ‘लोकमत’ने शौचालये चोरी प्रकरण प्रसिद्ध केल्यानंतर महापालिकेत दाखल झालेल्या ‘सुलभ’च्या अधिकाऱ्यांची आयुक्त तुकाराम मुंढे यांनी झाडाझडती घेतली. सुलभच्या शौचालयांची स्वच्छता महापालिकेचे कर्मचारी करीत असल्याच्या मुद्द्यावर त्यांची कानउघडणी करतानाच करार रद्द करण्याचा इशारा दिला आहे.  महापालिकेच्या वतीने अनेक ठिकाणी सुलभ शौचालय सुलभ कंपनीला पीपीपी तत्त्वावर तीस वर्षांसाठी दिले असून, मिळालेल्या माहितीनुसार शहरात एकूण असलेल्या ४०० पैकी १५९ शौचालये सुलभ कंपनीला आत्तापर्यंत चालवण्यास दिले आहेत. मात्र, त्याची दुरवस्था झाली आहे. नागरिकांच्या याबाबत तक्रारी असून महापालिकेचे कर्मचारी साफसफाई करीत आहेत. पे अ‍ॅँड युजच्या माध्यमातून संबंधित कंपनीला उत्पन्न मिळते मात्र स्वच्छतेची जबाबदारी महापालिकेला पार पाडावी लागते. याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या.  आयुक्तांनी केलेल्या तपासणीत १५९ पैकी ३६ शौचालये सुलभ कंपनी प्रत्यक्षात दाखवूच शकली नव्हती. त्यापार्श्वभूमीवर महापालिकेने सुलभ कंपनीला नोटीस पाठविली असून मंगळवारी (दि.२८) कंपनीचे अधिकारी तातडीने दाखल झाले. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांना खडसावून जाब विचारला असून, पाच दिवसांत सर्व शौचालये स्वच्छ करून देण्याचे आदेश देतानाच यापुढे महापालिकेचे कर्मचारी ते स्वच्छ करणार नाहीत, असे स्पष्ट केले  आहे.आयुक्तांच्या सूचनामहापालिकेने सुलभ कंपनीला दिलेली सर्व शौचालये जीओ टॅगने जोडण्यात यावीत तसेच अ‍ॅपला त्याची लिंक द्यावी आणि ई कनेक्टला ते जोडून नागरिकांची तक्रार आल्यास त्वरित त्याची दखल घ्यावी, अशा सूचना आयुक्तांनी केल्या आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक