मुंबई, पुण्यासह नाशिकचे वर्चस्व !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:19 IST2021-09-04T04:19:27+5:302021-09-04T04:19:27+5:30
नाशिक : वरिष्ठ आणि यूथ गटाच्या महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्सच्या अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी नाशिकसह मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर ...

मुंबई, पुण्यासह नाशिकचे वर्चस्व !
नाशिक : वरिष्ठ आणि यूथ गटाच्या महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्सच्या अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी नाशिकसह मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांनी वर्चस्व गाजवले. नाशिकच्या किसन तडवी, कोमल जगदाळे, अमीरा शेख, यमुना, दिशा, शुभम यांनीदेखील समारोपाच्या दिवशी आपापल्या गटांमध्ये अव्वल स्थान पटकावत बाजी मारली.
नाशिकच्या मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलातील सिंथेटिक ट्रॅकवर आयोजित केलेल्या वरिष्ठ आणि यूथ गटाच्या महिला आणि पुरुष यांच्या महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्सच्या अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पुणे संघाच्या खेळाडूंनी तर मुंबई उपनगरच्या खेळाडूंनी वर्चस्व राखून चांगली कामगिरी करून विविध प्रकारांत सुवर्णपदक प्राप्त केले. नाशिकच्या कोमल जगदाळेने ३००० मीटर स्टीपलंचेस या प्रकारात १०:३४:२८ मिनिटांसह सुवर्णपदक पटकावले. तर २३ वर्षे मुलीच्या थाळीफेक प्रकारात नाशिकच्या अमीरा शेखने ३९.९४ मीटर थाळी फेकून तर ५००० हजार मीटर धावणे प्रकारात नाशिकच्या किसन तडवीने पुन्हा १५:१२:६१ मिनिटांत रेस पूर्ण करून सुवर्णपदक पटकावले. महिलांच्या ५००० मीटरमध्ये नाशिकच्या संजीवनी जाधवनेही १६:३०:७२ या रेकॉर्ड वेळेत हे अंतर पूर्ण करून दुसरा क्रमांक मिळविला. महिलांच्या ८०० मीटर धावणे प्रकारात नाशिकच्या यमुना लडकतने हे अंतर २:०८:७९ मिनिटे या रेकॉर्ड वेळेत पूर्ण करून सुवर्णपदक मिळविले. २३ वर्षे मुलींमध्ये ८०० मीटर धावणे प्रकारात नाशिकच्या दिशा बोरसेने २:१७:२३ मिनिटांमध्ये हे अंतर पार करून सुवर्णपदक मिळविले. २३ वर्षे मुलामध्ये ३००० मीटर स्टीपलंचेसमध्ये नाशिकच्या शुभम भंडारेने हे अंतर ९:३४:९९ मिनिटांमध्ये पूर्ण करून पहिला क्रमांक मिळविला. २३ वर्षे मुलींमध्ये गोळाफेक प्रकारात पुरुषाप्रमाणे पुण्याच्या मुलींनीही वर्चस्व राखले. त्यामध्ये पुण्याच्या ऋषिका नेपाळीने सर्वात जास्त ९.४४ मीटर गोळा फेकून प्रथम, पुण्याच्याच साक्षी पागनीसने ८.७४ मीटर फेक करून दुसरा क्रमांक मिळविला तर नाशिकच्या निकिता दरेकरने ८.०६ मीटरवर गोळा फेकून तिसरे स्थान मिळविले. १५०० मीटर धावाने या प्रकारात सातारच्या वैष्णवी सावंतने ४:४६:४४ मिनिटांत हे अंतर पार करून पहिला क्रमांक तर नाशिकच्या दिशा बोरसेने ४:४७:१३ वेळ घेत दुसरे आणि नागपूरच्या रिया धोत्रेने हे अंतर ४:५४:३९ मिनिटांमध्ये पूर्ण करून तिसरे स्थान मिळविले.
इन्फो
राज्याच्या कामगिरीबाबत विश्वास
या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे महाराष्ट्राच्या संघाची निवड केली जाणार आहे. महाराष्ट्रचा संघ तेलंगणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत चांगली कामगिरी करेल, अशी आशा महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव सतीश उचील आणि नाशिक जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष तथा या स्पर्धेचे प्रमुख हेमंत पांडे यांनी व्यक्त केली.
फोट
०३ राज्य स्पर्धा