घरपट्टी वसुलीबाबत मुंबई, पिंपरी-चिंचवडचा अभ्यास
By Admin | Updated: November 2, 2015 23:15 IST2015-11-02T23:14:46+5:302015-11-02T23:15:27+5:30
महापालिका : वसुली वाढविण्याचे प्रयत्न

घरपट्टी वसुलीबाबत मुंबई, पिंपरी-चिंचवडचा अभ्यास
नाशिक : ‘स्मार्ट सिटी’कडे वाटचाल करायची असेल, तर महापालिकेला उत्पन्नवाढीवर भर देणे क्रमप्राप्त ठरणार आहे. त्यासाठीच घरपट्टी वसुलीसंदर्भात करविभागाचे उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी मुंबई आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचा नुकताच दौरा केला. मुंबईच्या धर्तीवर भांडवली मूल्यावर आधारित नाशिकमध्येही घरपट्टी वसुली पद्धत राबविता येईल काय, यावर विचार सुरू असून, त्यासंबंधीचा प्रस्ताव लवकरच आयुक्तांना सादर केला जाणार असल्याची माहिती दोरकुळकर यांनी दिली.
नाशिक शहराचा ‘स्मार्ट सिटी’ अभियानाच्या पहिल्या टप्प्यात समावेश झाला असून, दुसऱ्या टप्प्यात उत्तीर्ण होण्यासाठी महापालिकेची धडपड सुरू आहे.