शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई वेधशाळा : नाशकात गारांच्या पाऊस नाही; मात्र ढगाळ हवामान राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 23:05 IST

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात गारांच्या पावसाची शक्यता अल्प असल्याचे मुंबई वेधशाळेच्या हवामान तज्ज्ञांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देमध्य महाराष्ट्रात सोमवारी गारपीट, वादळी वा-यासह पाऊस होण्याची शक्यताहवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा उत्तर महाराष्ट्रात गारांच्या पावसाची शक्यता अल्प

नाशिक : मध्य महाराष्ट्रात सोमवारी (दि.११) मुंबई वेधशाळेकडून गारपिटीसह वादळी वारा अन् पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे; मात्र नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात गारांच्या पावसाची शक्यता अल्प असल्याचे मुंबई वेधशाळेच्या हवामान तज्ज्ञांनी म्हटले आहे.मागील दोन दिवसांपासून शहरात ढग दाटून येत असून, रविवारी दिवसभर ऊन-सावलीचा खेळ नाशिककरांनी अनुभवला. रविवारी पहाटे थंडीचा कडाका वाढला होता. सकाळी नऊ वाजेपर्यंत थंडी जाणवत होती. तसेच संध्याकाळी सहा वाजेपासून हवेत प्रचंड गारठा निर्माण झाल्याचे जाणवत होते. एकूणच हवामान बदलल्याने शेती व्यवसायावर त्याचा परिणाम जाणवत असून, नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. ढगाळ हवामानासह वा-याचा वेग शहरात सोमवारी कायम राहण्याची शक्यता वेधशाळेकडून वर्तविली गेली आहे. शनिवारी सकाळपासून वावटळ उठत होती. रविवारीदेखील वा-याचा वेग दुपारनंतर वाढला होता. संध्याकाळपासून वातावरण थंड झाले. मध्य महाराष्ट्रात  सोमवारी गारपीट, वादळी वा-यासह पाऊस होण्याची शक्यता असून, मराठवाडा परिसराला हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

रविवारी शहराच्या किमान तपमानाचा पारा १२.३ अंशांवर तर कमाल तपमान ३० अंश इतके नोंदविले गेले. शनिवारच्या तुलनेत तपमानात काहीशी वाढ झाली असली तरी संध्याकाळपासून वातावरण थंड झाले होते. त्यामुळे सोमवारी सकाळी किमान तपमान घसरण्याची अंदाज वर्तविण्यात आला आहे. शनिवारी कमाल तपमान थेट २८ अंशांपर्यंत वाढले व कि मान तपमान ११.७ अंशांपर्यंत घसरले होते. शुक्रवारी तपमानात कमालीचा बदल झाला होता. अचानकपणे वाढलेले कमाल-किमान तपमान घसरल्याने थंडीची तीव्रताही जाणवली. शुक्रवारी किमान तपमानाचा पारा पंधरा अंशांवरून ९.२ अंशांवर घसरला होता.

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिकSnowfallबर्फवृष्टीFarmerशेतकरीagricultureशेती