नामपूरला विद्यार्थ्यांचा मूक मोर्चा
By Admin | Updated: September 24, 2016 00:56 IST2016-09-24T00:51:25+5:302016-09-24T00:56:30+5:30
मराठा क्रांती मोर्चा : दहा हजार समाजबांधवांचा सहभागी होण्याचा निर्धार

नामपूरला विद्यार्थ्यांचा मूक मोर्चा
नामपूर : नाशिक येथे शनिवारी (दि. २४) निघणाऱ्या मराठा क्रांती मूक मार्चात सहभागी होण्याचा नामपूरकरांनी निर्धार केला आहे. या धर्तीवर विद्यार्थ्यांनी आज गावातून मूक मोर्चा काढला होता.
या मोर्चात उन्नती माध्यमिक विद्यालय, अभिनय प्राथमिक शाळा, नामपूर इंग्लिश स्कूल, नामपूर महाविद्यालय तसेच गावातील जिल्हा परिषदच्या सर्व शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते.
शहरातील पेट्रोलपंपापासून मोर्चाला प्रारंभ झाला. गावातील बसस्थानक, मोसम नदीकाठ, चार फाटा, आनंद चौक, शिवमनगर, साक्री चौफुली यामार्गे मार्चा झेंडा चौकात नेण्यात आला. मोर्चात कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी, गर्दी गोंगाट नव्हता. झेंडा चौकात समारोप करण्यात आला. नाशिक येथील मोर्चासंबंधी ग्रामस्थांना सूचना देण्यात आल्या व गावातून किती ग्रामस्थ मोर्चात
सहभागी होतील याचा आढावा घेण्यात आला.
नाशिकला जाण्यासाठी शनिवारी (दि.२४) पहाटे ६ वाजता गावातील सर्व समाजबांधवांनी उन्नती शाळेच्या प्रांगणावर जमावे असे आवाहन करण्यात आले. गावातील मूक मोर्चात गावातील महिला, पुरु ष, तरुणही सहभागी झाले होते. गावातून किमान दहा हजार समाजबांधव नाशिकच्या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली. (वार्ताहर)