उंबराच्या पानांतून शोधले बहुपयोगी औषध
By Admin | Updated: January 12, 2017 01:30 IST2017-01-12T01:30:29+5:302017-01-12T01:30:41+5:30
थायलंड जागतिक परिषद : धामनगावच्या एसएमबीटीतील युवा शास्त्रज्ञांचे संशोधन

उंबराच्या पानांतून शोधले बहुपयोगी औषध
लक्ष्मण सोनवणे : बेलगाव कुऱ्हे
उंबर म्हणजेच श्री दत्त दिगंबरांचे स्थान. हे झाड सर्वत्र आढळते आणि पूजलेदेखील जाते. परंतु त्याचे महत्त्व आणि त्यातील औषधी गुणधर्म अभ्यासून त्याचा उपयोग अनेक आजार दूर करण्यासाठीही केला जाऊ शकतो. या शास्त्रीय दृष्टिकोनातून इगतपुरी तालुक्यातील धामनगाव येथील एसएमबीटी इन्स्टिट्यूट आॅफ डी फॉर्मसीमधील वैज्ञानिकांनी या झाडाच्या पानांवरील फोड वाळवून, त्याची बारीक पावडर काही रसायनांद्वारे विलग करून मिळालेले शुद्ध स्वरूपातील एक्स्ट्रेक्ट अर्थात द्राव आपण वेदनाशामक, जखम भरण्याकरिता तसेच कॅन्सरवर प्रभावी औषध, सौंदर्यवर्धक तसेच आरोग्यवर्धक म्हणूनही वापरू शकतो, असा शोध लावला
आहे. त्याचे बहुपयोगी गुण शास्त्रोक्त पद्धतीने सिद्ध करण्यात त्यांना यश आले आहे. सदर संशोधन करताना, उंबराच्या पानावरील फोडात फिनॉल, टॅनिन, फ्लावोनॉइड्स आदि औषधी घटकांचे प्रमाण झाडाच्या इतर भागांपेक्षा जास्त आहे. या संशोधनासाठी संपूर्ण निधी एसएमबीटी ट्रस्ट करत आहे. डॉ. उशीर व डॉ. सिंग औषधनिर्माण क्षेत्रात अनेक वर्षांपासून संशोधन करत आहेत. आतापर्यंत डॉ. योगेश उशीर यांनी २ पुस्तके, ३० पेक्षा जास्त शोधनिबंध प्रसारित केले आहेत. तसेच २०१४ मध्ये मलेशिया येथे झालेल्या जागतिक परिषदेतही सहभाग घेतला आहे. वेदनेपासून मुक्तता मिळावी या जनकल्याणासाठी केलेले हे संशोधन आणि समाजोपयुक्त ठरणारे औषध तयार करून आपली असामान्य बुद्धिमत्ता सिद्ध करणाऱ्या डॉ. उशीर, डॉ. सिंग आणि सहकाऱ्यांना सर्वतोपरी पाठिंबा
देत येथील आमदार डॉ. सुधीर तांबे ट्रस्ट मुख्य कार्यकारी विश्वस्त डॉ. हर्षल तांबे, संघाचे अध्यक्ष मिलिंद कुकडे यांनी अभिनंदन केले आणि थायलंड येथील जागतिक परिषदेसाठी शुभेच्छा दिल्या.