नथुराम गोडसे यांच्या उदात्तीकरणाच्या निषेधार्थ मुक सत्याग्रह

By Sandeep.bhalerao | Published: January 19, 2024 05:03 PM2024-01-19T17:03:31+5:302024-01-19T17:07:30+5:30

कॉंग्रेसचे आंदोलन, रामकुंडावरील महात्मा गांधी ज्योत येथे गांधीगिरी.

Muk satyagraha to protest the elevation of nathuram godse in nashik | नथुराम गोडसे यांच्या उदात्तीकरणाच्या निषेधार्थ मुक सत्याग्रह

नथुराम गोडसे यांच्या उदात्तीकरणाच्या निषेधार्थ मुक सत्याग्रह

संदीप भालेराव, नाशिक: महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न काही संघटना जाणिवपुर्वक करीत असल्याचा आरोप करीत नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या वतीने शुक्रवारी (दि.१९) सकाळी रामकुंड पंचवटी येथील गांधी ज्योत येथे गांधीगिरी मार्गाने मुक सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.

यावेळी सहभागी झालेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तोंडाला काळी पट्टी बांधून आंदोलन केले. समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही संघटनांकडून करण्यात येत असल्याचा आरोप यावेळी अनेक मान्यवरांनी केला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देश हिताचा अहिंसेचा व मानवतेचा संदेश देण्याचे काम केले. गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याचे मात्र उदात्तीकरण केले जात असून हा प्रकार मानवतेला व देशाहिताला घात असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. अशाप्रवृत्तींच्या लोकांना सद्बुद्धी दे असा धावा यावेळी करण्यात आला.

या आंदोलनामध्ये प्रदेश प्रवक्त्या डॉ हेमलता पाटील, शहर काँग्रेस सेवादलाच्या अध्यक्ष डॉ वसंत ठाकूर, माजी नगरसेवक राजेंद्र बागुल, लक्ष्मण धोत्रे महिला काँग्रेसचे अध्यक्ष स्वाती जाधव, विजय राऊतल सुरेश मारूल ज्युली डिसूजा, ,वत्सला खैरे, सुचेता बच्छाव, हनीफ बशीर, उद्धव पवार , बबलू खैरे आदि. काँग्रेस पदाधिकारी सहभागी झाले होते.

Web Title: Muk satyagraha to protest the elevation of nathuram godse in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.