आखाड्यांच्या बैठकीत ठरणार ध्वजारोहणाचा मुहूर्त

By Admin | Updated: August 9, 2015 23:49 IST2015-08-09T23:48:45+5:302015-08-09T23:49:37+5:30

आखाड्यांच्या बैठकीत ठरणार ध्वजारोहणाचा मुहूर्त

Muhurat's flag hoisting ceremony at Akhada's meeting | आखाड्यांच्या बैठकीत ठरणार ध्वजारोहणाचा मुहूर्त

आखाड्यांच्या बैठकीत ठरणार ध्वजारोहणाचा मुहूर्त

नाशिक : साधुग्राममधील आखाड्यांमध्ये १९ आॅगस्ट रोजी ध्वजारोहण होणार आहे. त्यासाठी तिन्ही आखाड्यांमध्ये तयारी सुरू आहे. निर्वाणी, निर्मोही, दिगंबर या तिन्ही आखाड्यांच्या महंतांच्या बैठकीत आखाड्यातील ध्वजारोहणाचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती अखिल भारतीय पंच दिगंबर अनी आखाड्याचे महंत रामकिशोरदास शास्त्री यांनी दिली आहे.
ध्वजारोहण कोणत्याही राजकीय नेत्यांच्या हस्ते होणार नसून, तिन्ही आखाड्यांतील महंतच सामूहिकरीत्या ध्वजारोहण करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आखाड्यातील ध्वजारोहणासाठी राजकीय नेते आले तर त्यांचा सन्मान होईल. एक महिन्यासाठी ध्वजा असणार आहे. तसेच यादरम्यान आखाड्यांमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Muhurat's flag hoisting ceremony at Akhada's meeting