‘मुड्स आॅफ कुंभ’ प्रदर्शन
By Admin | Updated: October 18, 2015 23:43 IST2015-10-18T23:41:10+5:302015-10-18T23:43:23+5:30
‘मुड्स आॅफ कुंभ’ प्रदर्शन

‘मुड्स आॅफ कुंभ’ प्रदर्शन
नाशिक : ‘नाम’ या नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून नाशिकच्या नागरिकांतर्फे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने नाशिक येथील सहा छायाचित्रकारांनी एकत्र येत सोमवार (दि.१९) आणि मंगळवार (दि.२०) ‘मुड्स आॅफ कुंभ’ या छायाचित्राचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
चांडक सर्कल, तिडके कॉलनी येथील हॉटेल एसएसके सॉलिटर येथे हे छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. शहरातील अनिल पाटील, महेश कट्यारे, राम पवार, सचिन पाटील, समीर बोंदार्डे आणि श्रीकांत नागरे या सहा छायाचित्रकारांनी एकत्र येत सिंहस्थात टिपलेल्या विविध छबींचे या प्रदर्शनात दर्शन घडणार आहे. या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.