कसबे सुकेणे : निफाड तालुक्यातील कोकणगाव शिवारातील कादवा नदीत कसबे सुकेणे येथील ३७ वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आला असल्याची माहिती पिंपळगाव बसवंत पोलिसांनी दिली.
निफाड तालुक्यातील कोकणगाव शिवारात कादवा नदीत दिनांक २१ रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास नदीच्या खोल पात्रात मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती पिंपळगाव पोलिसांना मिळाली. दरम्यान, घटनास्थळी पिंपळगाव पोलिसांनी तत्काळ धाव घेतली असता मृतदेहाची ओळख पटवून दिली. सदरचा मृतदेह हा कसबे सुकेणे येथील संजय सुरज माळी (३७) यांचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. पिंपळगाव पोलिसांनी याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कादरी करत आहेत.