रस्त्यांवर साचलेला चिखल अन् प्रशासनाकडून बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:16 IST2021-08-23T04:16:54+5:302021-08-23T04:16:54+5:30

सुरगाणा : गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरूच असल्याने तालुक्यातील प्रमुख मार्गासह त्यांना जोडलेले रस्ते व दुर्गम भागातील बहुतांश रस्त्यांची ...

Mud on the roads evicted by the administration | रस्त्यांवर साचलेला चिखल अन् प्रशासनाकडून बेदखल

रस्त्यांवर साचलेला चिखल अन् प्रशासनाकडून बेदखल

सुरगाणा : गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरूच असल्याने तालुक्यातील प्रमुख मार्गासह त्यांना जोडलेले रस्ते व दुर्गम भागातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक रस्त्यांवर चिखल तुडवत वाट काढावी लागत आहे तर काही रस्त्यांवरील खड्ड्यांनी वाहनधारकांना अक्षरश: नाकात दम आणला आहे. सुरगाणा ते उंबरठाण व उंबरठाण ते बर्डीपाडा या गुजरातला जोडणाऱ्या महामार्गावर ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरील लहान भोरमाळ जवळील अपघाती वळणावर असलेल्या फरशी पुलावर खड्डे पडून तुंबलेल्या पाण्यातून वाहन नेताना मोठे भगदाड तर नसेल ना याची भीती निर्माण होते. याआधी याच फरशी पुलावर भगदाड पडून वाहतुकीस काही दिवस अडथळा निर्माण झाला होता. खरे तर या फरशी पुलाची थोडी उंची वाढवणे गरजेचे होते.

येथील बाराबंगला जवळील रस्त्याचे काम बंद करण्यात आल्याने या रस्त्याचे काम रखडले असून, परिणामी वाहतुकीस प्रचंड अडथळा निर्माण होत आहे. पायी चालणाऱ्या नागरिकांना देखील याचा त्रास दररोज सहन करावा लागत आहे. त्यामुळे पाऊस कमी होताच या रस्त्याचे काम इस्टीमेट प्रमाणे सुरू करून पूर्ण करून खोळंबणारी वाहतूक सुरळीत करण्याची मागणी केली जात आहे.

कायम रहदारी असलेल्या घाटमाथ्यावरील चिराई ते नागझरी फाटा या दरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली असून, हरणटेकडीपासून पुढे अंदाजे एक किलोमीटर रस्त्याची तर वाट लागली आहे. गेल्या काही वर्षांत या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही. सुरगाण्याहून वणीकडे जाण्यासाठी हा मधला व अतिशय महत्त्वाचा मार्ग असूनही हा रस्ता चांगला प्रतीचा व्हावा यासाठी कुणाकडूनही प्रयत्न झालेले दिसून आले नाही. या खराब रस्त्यामुळे असंख्य वाहनधारक बोरगावमार्गे जाणे पसंत करतात. खुंटविहीरकडे जाणारा रस्ता देखील खराब झाला आहे.

चिंचपाडा फाटा ते रगतविहीर हा रस्ता गेली काही वर्षे नूतनीकरणासाठी प्रतीक्षेत आहे. ठाणगाव इळींगपाडा रस्त्याची तर वाट लागून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. चिखलातून दुचाकी नेताना चालकांना सर्कस करावी लागत आहे. भवानदगड फाटा ते सतखांब या जुन्या रस्त्याचे नवीन रस्त्यात रूपांतर अद्यापही झाले नसल्याने या रस्त्याचीही वाट लागली आहे. यासारख्या बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी रस्ते मंजूर असून अद्याप काम सुरू करण्यात आलेले नाही. पावसाळा संपल्यानंतरच काम सुरू होण्याची शक्यता आहे.

इन्फो

काही ठिकाणी रस्तेच नाहीत

खुंटविहीर ते पिंपळसोंड रस्ता देखील खराब झाला आहे. गेल्या काही वर्षांत या रस्त्याचे नवीन डांबरीकरण झाले नाही.

भवानदगड फाटा - सतखांब बारी, ठाणगाव - इळींगपाडा, मनखेड - माणी, माणी - उंबरदे (प.), बाऱ्हे - खोकरविहीर, पळसन - बाऱ्हे, बाऱ्हे - ठाणगाव - बेडसे, राक्षसभुवन - ठाणगाव, मनखेड - जाहुले, मनखेड - कवेली - माणी - सुरगाणा, दोडीपाडा - म्हैसखडक, चिराई - हरणटेकडी - नागझरी फाटा, आंबोडे - केळावण, चिंपाडा फाटा ते रगतविहीर व तेथून पुढे गुजरात सीमेपर्यंत, पांगारणे - उदमाळ, पांगारणे - रांजुणे इत्यादी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तसेच भिवतास धबधबा जवळील फरशी पुलाच्या बाजूने काही वर्षांपासून खचलेला भराव अद्याप भरण्यात आलेला नाही. पिंपळसोंड - उदमाळ, उंबरपाडा - पिंपळसोंड - पारधी वस्ती, पिंपळसोंड - तातापाणी, उंबरपाडा - कुंभारचोंड वस्ती, रांजुणे - करवळपाडा आदी ठिकाणी रस्ता निर्माण करणे आवश्यक आहे.

फोटो- २१ सुरगाणा खबरबात

ठाणगाव - इळींगपाडा - बेडसे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य.

220821\22nsk_8_22082021_13.jpg

फोटो- २१ सुरगाणा खबरबात ठाणगाव - इळींगपाडा - बेडसे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य.

Web Title: Mud on the roads evicted by the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.