राहुड धरणात गाळ

By Admin | Updated: April 27, 2017 00:45 IST2017-04-27T00:44:47+5:302017-04-27T00:45:00+5:30

चांदवड : बंधाऱ्यातील गाळ काढून जीवदान द्यावे, अशी मागणी जिवाशी प्रतिष्ठानच्या वतीने प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Mud in the road dam | राहुड धरणात गाळ

राहुड धरणात गाळ

चांदवड : तालुक्यातील राहुड बंधाऱ्यातील गाळ काढून परिसराला जीवदान द्यावे, अशी मागणी जिवाशी प्रतिष्ठानच्या वतीने प्रांताधिकारी भीमराज दराडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
राहुड बंधारा हा राष्ट्रीय महामार्गानजीक असून, सध्या तो कोरडाठाक पडला आहे. तालुक्यातील अनेक गावांत जलयुक्त शिवार योजनेची कामे सुरू आहेत. यात पाझर तलाव, बंधाऱ्यातील गाळ काढण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत राहुड बंधाऱ्यातील गाळ काढला तर उसवाड, राहुड, डोंगरगाव, कळमदरे, चांदवड आदी गावांना याचा फायदा होणार आहे.
खोली नसल्याने राहुड धरणातील पाणी वाहून जाते त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होते. सदर बंधाऱ्याची खोली वाढविल्यास परिसरातील गावांना फायदा होऊ शकतो.
जलयुक्तमधून या धरणातील गाळ काढावा, अशी मागणी सुनील कासव, उदय वायकोळे, सोमनाथ देशमाने, रुपेश गायकवाड, महेंद्र निकम आदींसह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Mud in the road dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.