नववसाहतीत जलवाहिनीच्या काम रस्त्यांवर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 16:01 IST2020-08-30T16:00:18+5:302020-08-30T16:01:21+5:30
सटाणा : शहरांतर्गत सुरु असलेल्या जलवाहिन्यांच्या कामामुळे नववसाहतीअंतर्गत रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. पावसामुळे संपूर्ण रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरून छोट्या-मोठ्या दुर्घटना होत असुन पालिका प्रशासनाने रस्ते चिखल मुक्त करावेत अशी मागणी केली जात आहे.

सटाणा शहरातील क्र ांतीनगर भागात जलवाहिन्या टाकण्याच्या कामामुळे रस्त्यावर असा सर्वत्र चिखल झाला आहे.
सटाणा : शहरांतर्गत सुरु असलेल्या जलवाहिन्यांच्या कामामुळे नववसाहतीअंतर्गत रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. पावसामुळे संपूर्ण रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरून छोट्या-मोठ्या दुर्घटना होत असुन पालिका प्रशासनाने रस्ते चिखल मुक्त करावेत अशी मागणी केली जात आहे.
पालिकेच्यावतीने पुनंद पाणीपुरवठा योजनेंतर्गत शहरात जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. शहरातील अभिमन्यू नगर व क्र ांतीनगर या नववसाहतीत अनेक ठिकाणी चांगले रस्ते फोडुन जलवाहिन्या टाकण्याचे काम करण्यात आले आहे. त्यातच पावसाळा असल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे बरीच वाहने चिखलात फसून जातात तर काही चिखलातून मार्गक्र मण करतांना वाहने घसरून अपघात होत आहेत. रस्त्याच्या दुर्दशेमुळे स्थानिक रहिवाशांबरोबरच बाहेरून येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेच्या मुख्याधिकारी यांच्याशी अभिमन्यु नगर व क्र ांतीनगर मधील स्थानिक रहिवासी विजय वाघ, भालचंद्र कोठावदे, शरद नदाळे, काशिनाथ सूर्यवंशी, रतीलाला बागुल, प्रशांत कोठावदे, शिवदे, लांडगे आदींच्या वतीने रस्ता सुरळीत व्हावा म्हणून मुरूम टाकण्याची मागणी केली जात आहे.
दुरु स्तीसाठी टोलवाटोलवी ...
नववसाहतीमधील रहिवाशी विजय वाघ यांनी अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर मुरूम टाकण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे केली होती. मात्र त्यांच्याकडून सांगण्यात आले की या रस्त्यावर संबंधित ठेकेदार मुरूम टाकून रस्ता सुरळीत करतील. याबाबत ठेकेदाराशी संपर्क साधला असता त्यांच्याकडुन सांगण्यात आले की आमच्याशी असे कुठल्याही प्रकारचे बोलणे झाले नसुन आम्ही मुरूम टाकू शकत नसल्याचे सांगून इन्कार केला आहे. पालिका प्रशासन आणि ठेकेदाराच्या टोलवाटोलवीमुळे रहिवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.