कळवण बाजार समिती आवारात चिखलाचे साम्राज्य
By Admin | Updated: September 11, 2014 00:27 IST2014-09-10T22:39:15+5:302014-09-11T00:27:34+5:30
कळवण बाजार समिती आवारात चिखलाचे साम्राज्य

कळवण बाजार समिती आवारात चिखलाचे साम्राज्य
पाळे खुर्द : कळवण उत्पन्न बाजार समितीच्या आवारात चिखलामुळे शेतकरी वर्गाचे अतोनात हाल
होताना दिसून येत आहे. लिलावासाठी चिखल तुडवत जावे लागत आहे,
असे शेतकऱ्यांनी सांगितले. मार्केट यार्डमध्ये राहण्यासाठी शेड नाही, लाईट सुविधा नाही अशा विविध समस्यांना शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. कळवण बाजार समितीमध्ये एका शेतकऱ्यांनी तीन दिवसापासून कांदा लिलावसाठी ट्रक्टर आणले असून चिखलामुळे
लिलाव झाला नाही पावसाळ्यामुळे चिखल होत असून शेतकर्याचे
मोठे हाल होत आहे,कांद्याला
भाव नाही दुसरीकडे मार्केट
आवारात चिखलमय झाले आहे चिखलामुळे गाड्या फासत आहेत. वाहन चालकांचे हाल होत असताना दिसून येत आहे.
कळवण उत्त्पन बाजार समतिी काही उपाययोजना करणे आवशयक असून त्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. (वार्ताहर)