कपालेश्वर मंदिराजवळ मातीचा ढिगारा कोसळला

By Admin | Updated: July 19, 2016 01:58 IST2016-07-19T01:54:27+5:302016-07-19T01:58:00+5:30

जोरण : मध्यरात्रीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट

The mud collapses near the Temple of Kapleveshwar | कपालेश्वर मंदिराजवळ मातीचा ढिगारा कोसळला

कपालेश्वर मंदिराजवळ मातीचा ढिगारा कोसळला

 जोरण : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील कसमादे परिसरातील सटाणापासून वीस किलोमीटर अंतारावर असलेले देवस्थान श्रीक्षेत्र कपालेश्वर मंदिराजवळील मातीचा मोठा ढिगारा एकादशीच्या मध्यरात्री कोसळला. मध्यरात्रीच्या वेळी ही घटना घडल्याने सुदैवाने कुठल्याही जीवितहानी झाली नाही. यंदा पावसास उशिराने सुरुवात झाली. जुलै महिन्यातील ७ तारखेला मुसळधार पावसाने सुरुवात झाली . सलग दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस झाल्याने येथील मातीचे धपाड पूर्ण मुरल्याने ते कोसळले. येथील मातीचा ढिगारा काढण्याचे काम युद्धपातळीवर सूर आहे.
येथील श्रीराम मंदिराच्या पाठीमागे येथे येणाऱ्या भाविकांसाठी राहण्यासाठी खोल्या व पिण्याची पाणी टाकी बांधलेली आहे. तेथील मातीचा ढिगारा कोसळला. एकादशीच्या दिवशी मंदिरातील मठाधिपती पोपट नाना महाराज हे या ठिकाणी नव्हते. ते पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनाला गेले होते. अचानक पडलेले हे मातीचे धपाड पडले. ही घटना मध्यरात्री घडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली. नाही. मोठे धपाड पडले असते तर शेजारील पाणीची टाकी, बिल्डिंग, मंंिदर, शेड यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते. ही घटना मध्यरात्री घटल्याने कोणतेही नुकसान झाले नाही. (वार्ताहर)

Web Title: The mud collapses near the Temple of Kapleveshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.