शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

अहमदनगर जिल्ह्यातील नवनाथ प्रदक्षिणा मार्गाचे रूपडे पालटणार : एमटीडीसी

By azhar.sheikh | Updated: March 3, 2018 20:52 IST

नाथ संप्रदायातील नऊ नाथांचे गर्भगिरी परिसरात वास्तव्य होते. या ठिकाणांचे नाथ संप्रदायात मोठे महत्त्व असून, या भागात नऊ नाथांची समाधीस्थळे आहेत. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक पर्यटक या ठिकाणी हजेरी लावतात.

ठळक मुद्देनऊ नाथांचे गर्भगिरी परिसरात वास्तव्य स्वतंत्ररीत्या नवनाथ प्रदक्षिणा मार्ग धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याचे ठरविले पर्यटन विकास महामंडळाचा (एमटीडीसी) कालबद्ध कृती आराखडा

नाशिक : राज्यातील सामाजिक-धार्मिक महत्त्व असलेल्या स्थळांचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करत धार्मिक पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने अहमदनगर जिल्ह्यातील मढी व श्री सिद्ध नवनाथ स्थानाच्या प्रदक्षिणा मार्गाच्या विकासाच्या दृष्टीने पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) कालबद्ध कृती आराखडा तयार करत असल्याची माहिती सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली.नाथ संप्रदायातील नऊ नाथांचे गर्भगिरी परिसरात वास्तव्य होते. या ठिकाणांचे नाथ संप्रदायात मोठे महत्त्व असून, या भागात नऊ नाथांची समाधीस्थळे आहेत. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक पर्यटक या ठिकाणी हजेरी लावतात. पर्यटनाच्या दृष्टीने वाव असलेले हे धार्मिक स्थळ अद्याप उपेक्षित असून, विकासापासून कोसो दूर राहिल्याने भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता; मात्र पर्यटन महामंडळाने याबाबत दखल घेऊन धार्मिक पर्यटन केंद्र विकसित करण्यासाठी स्वतंत्ररीत्या नवनाथ प्रदक्षिणा मार्ग धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याचे ठरविले आहे. अहमदनगरच्या वांबोरीपासून पूर्वेकडून बीड-उस्मानाबादकडे गेलेला सह्याद्रीचा डोंगर. या डोंगराच्या वांबोरी ते बीडच्या रायमाहपर्यंतच्या सुमारे ११५ कि.मी.च्या डोंगर परिसराला गर्भगिरी म्हटले जाते. या गर्भगिरीमध्ये एकवटलेली नवनाथांची स्थाने भारतभरात कोठेही आढळत नाही. त्यामुळे दरवर्षी हजारो पर्यटक गर्भगिरी प्रदक्षिणेसाठी हजेरी लावतात, अशी माहिती माजी सनदी अधिकारी रघुनाथ राठोड यांनी यावेळी दिली. याप्रसंगी प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे उपस्थित होते.आदिनाथ वृद्धेश्वराचे मंदिर हे गर्भगिरीचे केंद्र असून त्याबरोबरच मच्छिंद्रनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ व गहिनीनाथ यांची समाधीस्थळे आहेत. गोरक्षनाथ, अडबंगनाथ, बाळनाथ यांची साधनास्थळे आहेत. तसेच ब्राह्मणी-सोनई-वांबोरी-रामेश्वर, सावरगाव येथेदेखील त्यांच्या विहार-वास्तव्याची स्मृतिस्थळे असल्याचे राठोड म्हणाले. हा संपूर्ण परिसर नवनाथ प्रदक्षिणा मार्ग म्हणून ओळखला जातो. या संपूर्ण परिसराचा विकास महामंडळाच्या वतीने साधला जाणार आहे. यासाठी स्वतंत्ररीत्या कृ ती आराखडा आखण्यात आला असून, विकासकामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

महामंडळाची बससेवापरिवहन महामंडळाच्या अहमदनगर विभागासोबत संपर्क साधून या प्रदक्षिणा मार्गावर बससेवा उपलब्ध क रून देत पॅकेज टूरबाबत विचार करावा, यादृष्टीने पर्यटन महामंडळाने पत्रव्यवहार केला होता. यास महामंडळाने सकारात्मक प्रतिसाद देत प्रायोगिक तत्त्वावर बससेवा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. त्यानुसार पॅकेज टूर वरील मार्गाला लक्षात घेऊन प्रस्तावित करण्याचे प्रयोजन सुरू असल्याचे राठोड यावेळी म्हणाले.

 

टॅग्स :NashikनाशिकAhmednagarअहमदनगरTempleमंदिरtourismपर्यटन