महावितरणचा ‘शॉक’; मीटर रीडिंग घेण्यास दिवसाचा उशीर, ग्राहकांना बसतोय फटका?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:15 IST2021-07-27T04:15:07+5:302021-07-27T04:15:07+5:30
नाशिक: वीज ग्राहकांना मीटर रीडिंगप्रमाणे वीज बिल दिले जात असून युनिटच्या स्लॅबनुसार ग्राहकांना वीज बिल भरावे लागते. शंभर युनिटपर्यंत ...

महावितरणचा ‘शॉक’; मीटर रीडिंग घेण्यास दिवसाचा उशीर, ग्राहकांना बसतोय फटका?
नाशिक: वीज ग्राहकांना मीटर रीडिंगप्रमाणे वीज बिल दिले जात असून युनिटच्या स्लॅबनुसार ग्राहकांना वीज बिल भरावे लागते. शंभर युनिटपर्यंत वीज बिल असेल तर ३ रुपये ४४ पैसे दराने ग्राहकांना वीज आकारणी केली जाते; परंतु त्यापुढे म्हणजे १०१ युनिट बिल गेले तर ग्राहकांना ७ रुपये ३४ या दराने बिल आकारल जाते. मीटर रीडिंग करण्यास एक दिवसाचा जरी विलंब झाला तरी ग्राहकांना आर्थिक फटका बसत असल्याचा संशय ग्राहकांना आहे. महावितरणकडून मात्र इन्कार करण्यात येत आहे.
खासगी संस्थेच्या माध्यमातून मीटरचे रीडिंग केले जात असून ग्राहकांना देखील आपले मीटर रीडिंग पाठविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. ज्यामुळे ग्राहक स्वत: यासाठी पुढे आल्यास अशा तक्रारी कमी होऊ शकतील. आता तर एसएमसद्वारे देखील ग्राहकांना मीटर रीडिंग पाठविता येते. ज्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी कमी होऊ शकतील.
--इन्फाे--
महावितरणचे ग्राहक घरगुती: १० लाख ७० हजार
कृषी: ३ लाख ५० हजार
औद्योगिक: १६ हजार ८००
--इन्फो---
१०० युनिट: पहिल्या शंभर युनिटला ग्राहकांना ३.४४ रुपये इतके वीज बिल आकारले जाते. घरगुती वीज वापरणाऱ्या ग्राहकांना शक्यतो शंभर ते दीडशे युनिटपर्यंत वीज बिल येते.
१०१ ते ३०० युनिट: वीज युनिटच्या वापराचा दुसरा स्लॅब हा शंभर युनिटच्या पुढे सुरू होतो. १०१ ते ३०० युनिटपर्यंतच्या वीज बिलासाठी ७ रुपये ३४ पैसे इतका युनिट दर आकारला जातो.
३०१ युनिटपुढे: तिसऱ्या टप्प्यातील युनिट हे ३०१ च्यापुढे मोजले जाते. या युनिटसाठी ग्राहकांना १० रुपये ३६ पैसे इतका दर आकारला जातो. वाढत्या वापरामुळे अनेकांचा वापर हा ५०० युनिटपर्यंत पोहोचला आहे.
--इन्फो--
अशा आहेत तक्रारी
उदाहरण १: विजेच्या वाढत्या दरामुळे विजेचा वापर करूनही वीज बिल कमी झालेले नाही. मागीलवर्षी जून महिन्यात ५१३ विजेचा वापर होता. यावर्षी वापर १५५ पर्यंत आणला तरी दीड हजार बिल भरावे लागले. त्यातही त्यांनी विलंब आकाराचे कारण सांगितले मात्र ते समजण्यापलीकडे असल्याची एका ग्राहकांची तक्रार आहे.
उदाहरण२: गेल्या तीन महिन्यांपासून घर बंद असताना बंद घराचे वीज बिल ११ हजार आल्याचा प्रकार गंगापूररोडवरील एका ग्राहकाच्या बाबतीत घडला. गेल्या तीन महिन्यांपासून भाडेकरी राहत नसतानाही युनिट वाढत कसे गेले आणि अंदाजे बिल लावताना मागील युनिट तपासले गेले नसल्याची त्यांची तक्रार आहे.
--कोट--
वीज मीटरचे रीडिंग विलंबाने झाले आणि त्यामुळे ग्राहकांना शंभर युनिटच्या पुढच्या युनिटचा दर लागतो हे पूर्णपणे चुकीचे आहे. एक महिन्याच्या पुढे दोन-चार दिवस झाले तर तितक्या दिवसाचे वीज बिल विभागून दिले जाते. ग्राहकांकडून जादा बिल घेतले जात नाही. ग्राहकांनी हे समजून घेतले पाहिजे.
-दरोली, अधीक्षक अभियंता, नाशिक
५५०
११० - शंभरचा रेट लागतो
260721\26nsk_17_26072021_13.jpg
वीज मीटर डमी