महावितरणचे कनिष्ट अभियंता बोरकर निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 01:01 IST2021-04-01T21:52:38+5:302021-04-02T01:01:22+5:30

दिंडोरी : महावितरण दिंडोरी कक्ष १ येथे कार्यरत असलेले कनिष्ट अभियंता अभिनय रमेश बोरकर यांना निलंबित करण्यास आले.

MSEDCL junior engineer Borkar suspended | महावितरणचे कनिष्ट अभियंता बोरकर निलंबित

महावितरणचे कनिष्ट अभियंता बोरकर निलंबित

ठळक मुद्देरास्ता रोको करत संबंधित मुजोर अधिकाऱ्यास निलंबित करण्याची मागणी लावून धरली होती.

दिंडोरी : महावितरण दिंडोरी कक्ष १ येथे कार्यरत असलेले कनिष्ट अभियंता अभिनय रमेश बोरकर यांना निलंबित करण्यास आले.

दिंडोरी तालुक्यातील मडकीजांब येथील शेतकरी निवृत्ती बोराडे यांनी वीज बिल भरणा केला असून लाईट जोडणी करण्यासाठी महावितरणचे कनिष्ट अभियंता अभिनय बोरकर यांना फोन केला होता.
याबाबत बोरकर यांनी शेतकऱ्यांस अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याची ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर दिंडोरी येथे सर्वपक्षीय नेते व शेतकऱ्यांनी तीन तास रास्ता रोको करत संबंधित मुजोर अधिकाऱ्यास निलंबित करण्याची मागणी लावून धरली होती.

त्यावेळी महावितरणचे जिल्हा कार्यकारी अभियंता व शासकीय अधिकारी यांनी संबंधित अधिकारी यास निलंबन करण्याचे आश्वासन दिले होते. याबाबत विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी लक्ष घालत संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दिले होते.
गुरुवारी (दि.१) याबाबतचा निर्णय होवून अभिनय बोरकर यांना निलंबित केले आहे.अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी दिली. तर महावितरणचे वरिष्ठ अधिकारी व शासकीय अधिकारी यांनीही यास दुजोरा दिला आहे.

Web Title: MSEDCL junior engineer Borkar suspended