खासदार विजय दर्डा आज नाशकात

By Admin | Updated: May 21, 2016 22:37 IST2016-05-21T22:37:10+5:302016-05-21T22:37:34+5:30

खासदार विजय दर्डा आज नाशकात

MP Vijay Darda in Nashik today | खासदार विजय दर्डा आज नाशकात

खासदार विजय दर्डा आज नाशकात

 नाशिक : ‘लोकमत’च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन तथा खासदार विजय दर्डा रविवारी (दि. २२) नाशकात येत असून, ९५ वर्षांची परंपरा असलेल्या वसंत व्याख्यानमालेत त्यांचे व्याख्यान होणार आहे.
गोदाघाटावरील यशवंतराव महाराज पटांगणावर सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम होईल. मूळचंदभाई गोठी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ होणाऱ्या या व्याख्यानात ‘मैं कौन हूॅँ और मैं क्या हूॅँ?’ या विषयावर दर्डा मार्गदर्शन करणार आहेत. राजकारण, समाजकारण व पत्रकारितेच्या क्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्या दर्डा यांचे व्याख्यान ऐकण्याची संधी नाशिककरांना लाभणार असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: MP Vijay Darda in Nashik today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.