मालेगाव जिल्हानिर्मितीच्या हालचाली गतिमान

By Admin | Updated: June 20, 2014 00:25 IST2014-06-20T00:25:50+5:302014-06-20T00:25:50+5:30

नाशिक : ठाणे जिल्हा विभाजनाचा निर्णय झाल्यानंतर आता मालेगाव जिल्हा निर्मितीबाबत सरकारी पातळीवरून हालचाली गतिमान

Moving movement of Malegaon district | मालेगाव जिल्हानिर्मितीच्या हालचाली गतिमान

मालेगाव जिल्हानिर्मितीच्या हालचाली गतिमान

नाशिक : ठाणे जिल्हा विभाजनाचा निर्णय झाल्यानंतर आता मालेगाव जिल्हा निर्मितीबाबत सरकारी पातळीवरून हालचाली गतिमान झाल्या असून, गुरुवारी (दि.१९) यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सर्व विभागप्रमुखांच्या बैठकीत मालेगाव जिल्हा निर्मितीबाबतच्या कार्यालयांची तसेच कर्मचाऱ्यांच्या आस्थापनेबाबतची माहिती मागविण्यात आली आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. बैठकीत महसूल, जिल्हा परिषद, पोलीस, एस. टी. वीज वितरण, समाजकल्याण यांसह विविध विभागांचे अधिकारी व खातेप्रमुख उपस्थित होते. या बैठकीत मालेगाव जिल्हा निर्मिती झाल्यास आवश्यक असलेल्या गोष्टींचा आढावा घेण्यात आला. त्यासाठी नेमक्या काय काय आवश्यक बाबी आहेत, त्याबाबत सर्वच विभागांकडूनही माहिती मागविण्यात आली आहे. त्यात विभागाचे नाव, जिल्हा कार्यालयाचे नाव, प्रस्तावित कार्यालयाकरिता उपलब्ध असलेल्या इमारतींची माहिती, इमारत उपलब्ध नसल्यास कार्यालय कशाप्रकारे कार्यान्वित करता येईल, याबाबतचा तपशील खर्चाच्या अंदाजासह निर्माण करावयाची पदे (सध्या उपलब्ध असलेल्या पदाव्यतिरिक्त अधिकारी/कर्मचारी यांचा तपशील आकृतीबंधानुसार) जसे वर्ग पदनाम, पदसंख्या, मालेगाव येथे विभागाचे उपलब्ध असलेले कार्यालय व आवश्यक असलेले कार्यालय, वाहनाची उपलब्धतता असल्यास तपशील, नसल्यास त्याबाबतची मागणी खर्चाच्या अंदाजासह, जिल्हा कार्यालयासाठी आवश्यक तपशील जसे इमारती कार्यालय बांधण्याचा तपशील, संवर्गनिहाय पद निमीर्तीचा तपशील खर्चाच्या तपशीलासह, वाहने, कार्यालयीन सुविधावरील खर्च व तपशील आदि बाबींचा त्यात समावेश आहे. ही माहिती तातडीने मागविण्यात आल्याने मालेगाव जिल्हा निर्मितीबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Moving movement of Malegaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.