करदात्याच्या दारापुढे हलगीचा सूर

By Admin | Updated: March 23, 2017 21:43 IST2017-03-23T21:43:20+5:302017-03-23T21:43:37+5:30

येवला :शहरातील थकीत करदात्याच्या दारापुढे जाऊन येवल्याचा पारंपरिक उत्सवासाठी वापरला जाणारा हलगीचा सूर आता करदात्याला कर भरण्याचे आवाहन करण्यासाठी वापरला जात आहे.

Moving around the tax payer's door | करदात्याच्या दारापुढे हलगीचा सूर

करदात्याच्या दारापुढे हलगीचा सूर


 येवला : येवला नगरपालिकेने शहरात सक्त करवसुलीचे धोरण अवलंबले असून या वसुलीचा भाग म्हणून शहरातील थकीत करदात्याच्या दारापुढे जाऊन येवल्याचा पारंपरिक उत्सवासाठी वापरला जाणारा हलगीचा सूर आता करदात्याला कर भरण्याचे आवाहन करण्यासाठी वापरला जात आहे.
महाराष्ट्र शासनाने यंदा १०० टक्के करवसुलीचे उद्दिष्ट सर्व नगरपालिकांना दिल्याने पालिका बेधडक कारवाई करीत आहे. जेवढी मिळेल तेवढी रक्कम पदारात पाडून उरलेली रक्कम दि.३० मार्चच्या आत भरण्याचे आवाहन या करवसुली पथकाकडून केले जात आहे. नळ कनेक्शनधारक ग्राहकाकडून थकलेल्या कराअभावी त्यांचे नळ कनेक्शन कट करण्याचे धोरण पालिकेने अवलंबले आहे. या मोहिमेत उपमुख्याधिकारी आर. आय. शेख, भांडारपाल विजय शिंदे, संगणक अभियंता अभितोष सांगळे, स्वच्छता अभियंता सत्यवान गायकवाड, अशोक कोकाटे, सुनील जाधव, विरेंद्र परदेशी, रवींद्र कदम, घनश्याम उंबरे, उदय परदेशी, अरुण चव्हाण आदि कर्मचारी सहभागी झाले होते. १५ ते १८ मार्च या कालावधीत नगरपालिकेने जुन्या कार्यालयात विशेष करवसुली शिबिराचे आयोजन केले होते. त्यास शहरातील नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे.
वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कालावधी कमी असल्याने सुटीच्या दिवशीदेखील करवसुली करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्याकडे असलेली कराची रक्कम तत्काळ भरावी, असे आवाहन मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी केले आहे. अशा प्रकारची सक्त वसुलीची मोहीम शहरात चालू असून थकबाकी असलेल्या नागरिकांचे नळ कनेक्शन तोडले जात आहे व थकीत घरपट्टी असलेल्या नागरिकांवर मालमत्ता जप्तीसारखे निर्णय घेतले जातील, असे नगरपालिकेने स्पष्ट केले आहे. असे कटू प्रसंग टाळण्यासाठी व शहराच्या विकासास हातभार लावण्यासाठी नागरिकांनी कर भरून सहकार्य करावे, असे आवाहन नगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
(वार्ताहर)

Web Title: Moving around the tax payer's door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.