मोहाडीत कोविड विलगीकरण कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:14 IST2021-05-01T04:14:27+5:302021-05-01T04:14:27+5:30
या विलगीकरण कक्षात ४० बेडची व्यवस्था करण्यात आली असून महिलांसाठी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था आहे. यामध्ये २४ तास वीज पुरवठा, ...

मोहाडीत कोविड विलगीकरण कक्ष
या विलगीकरण कक्षात ४० बेडची व्यवस्था करण्यात आली असून महिलांसाठी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था आहे. यामध्ये २४ तास वीज पुरवठा, फॅन, कुलर, विश्रांतीसाठी बेड, आरामखुर्च्या, पिण्याचे शुद्ध पाणी, गरम पाणी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राबरोबरच खाजगी सेवा देणारे गावातील डॉक्टर्स यांचे मोफत मार्गदर्शन व सल्ला उपलब्ध करून दिला जाणार आहे. रुग्णांसाठी गायरान समितीकडून रोज फळांचे वाटप तर तलाठी संघटनेकडून ऑक्सिजन मशीन्स, ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व सुविधांबरोबरच चहा व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भोजनाची व्यवस्था मात्र रुग्णांच्या नातेवाइकांनी डबा पद्धतीने करायची आहे. विलगीकरण कक्षासाठी अनेकांनी आर्थिक मदत देऊ केली असून काहींनी स्वयंसेवक म्हणून जबाबदारी घेतली आहे. कक्षात पहिल्याच दिवशी पाच रूग्णांनी प्रवेश घेतला असून इतर घरी उपचार घेत असणाऱ्या बाधितांनी स्वयंस्फूर्तीने दाखल व्हावे असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.
फोटो- ३० मोहाडी कोविड
===Photopath===
300421\30nsk_30_30042021_13.jpg
===Caption===
फोटो- ३० मोहाडी कोवीड