शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
2
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
3
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
4
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
5
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
6
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
7
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
8
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
9
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
10
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
11
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
12
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
13
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
14
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
15
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
16
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
17
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
18
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
19
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
20
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
Daily Top 2Weekly Top 5

नदीजोड प्रकल्पाच्या सुधारित आराखड्यासाठी हालचाली गतिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 00:52 IST

सिन्नर : दमणगंगा-वैतरणा-कडवा-देवनदी नदीजोड प्रस्तावित प्रकल्पाद्वारे पश्‍चिमवाहिनी नद्यांचे पाणी सिन्नर तालुक्याला मिळाल्यास दुष्काळाचा कलंक कायमचा पुसला जाणार आहे. त्यामुळे केंद्रीय जल आयोग व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत धोंडवार, औंढेवाडी, सोनांबे, कोनांबे शिवारात पाहणी दौरा केला. भौगोलिक रचनेचा बारकाईने अभ्यास करून प्रकल्प यशस्वी होण्यासाठी किफायतशीर मार्ग दर्शवत आमदार माणिकराव कोकाटे यांनी प्रकल्प अहवालाचा सुधारित आराखडा तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

ठळक मुद्दे दमणगंगा-वैतरणा-कडवा-देवनदी जोड प्रकल्प : अधिकारी, लोकप्रतिनिधींकडून स्थळपाहणी

सिन्नर : दमणगंगा-वैतरणा-कडवा-देवनदी नदीजोड प्रस्तावित प्रकल्पाद्वारे पश्‍चिमवाहिनी नद्यांचे पाणी सिन्नर तालुक्याला मिळाल्यास दुष्काळाचा कलंक कायमचा पुसला जाणार आहे. त्यामुळे केंद्रीय जल आयोग व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत धोंडवार, औंढेवाडी, सोनांबे, कोनांबे शिवारात पाहणी दौरा केला. भौगोलिक रचनेचा बारकाईने अभ्यास करून प्रकल्प यशस्वी होण्यासाठी किफायतशीर मार्ग दर्शवत आमदार माणिकराव कोकाटे यांनी प्रकल्प अहवालाचा सुधारित आराखडा तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.या प्रस्तावित प्रकल्पाद्वारे तालुक्याला सात टीएमसी पाणी मिळणार आहे. तत्कालीन राज्य सरकारने प्रकल्प रद्द करून हेच पाणी मराठवाड्याला देण्याची तयारी चालविली होती. त्याला आमदार कोकाटे यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. स्थळपाहणी दौऱ्यानंतर येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी प्रकल्प अहवालाच्या सुधारित आराखड्याबाबत माहिती दिली.केंद्रीय जल आयोगाचे कार्यकारी अभियंता रामा राजू, एम. एन. राव, नायर, अहमदनगरचे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता नाईक, नांदूरमधमेश्‍वर प्रकल्प उपविभागाचे कार्यकारी अभियंता शिंपी, उपअभियंता सोनवणे, स्थानिक स्तरचे सेवानिवृत्त उपअभियंता अविनाश लोखंडे आदींचा दौऱ्यात समावेश होता.दमणगंगा खोऱ्यातील पश्‍चिमवाहिनी सात टीएमसी पाणी सिन्नर तालुक्यातील सिंचन व औद्योगिक क्षेत्रासाठी (डीएमआयसी) वापरण्याचा प्रस्ताव आहे. गतकाळात खासदार हेमंत गोडसे यांनी सर्वेक्षणासाठी २३ कोटी रुपयांचा निधी मिळवला. मात्र त्यावेळी कडवा ते सोनांबे अशी २० किमीची पाइपलाइन गृहीत धरण्यात आली होती. त्यामुळे पम्पिंगसाठी वीज व देखभाल-दुरुस्तीचा खर्च झेपला नसता. त्यातल्या त्यात जुन्या आराखड्यात तालुक्याचा काही भाग पुन्हा पाण्यापासून वंचित राहणार होता.परिणामी प्रकल्पाची मंजुरी आणि यशस्वीता यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. आपण नदीजोड प्रकल्पाद्वारे पिंपळगाव घाडगाच्या मेंगाळवाडीजवळून केवळ एका टप्प्यात १२० मीटर उचलून एक ते दीड किमी बोगद्यातून पाणी धोंडबार-औंढेवाडीजवळ देवनदीत पाडण्याचा किफायतशीर मार्ग सुचवला असल्याचे आमदार कोकाटे यांनी सांगितले.येत्या महिना-दोन महिन्यांत आराखडा तयार होईल. राज्य शासनाने स्वत:च्या पैशांतून प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचा हा प्रकल्प आहे. त्यामुळे हा प्रकल्प मंजूर केल्याशिवाय शांत बसणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.खर्च ५ हजार कोटी; २८ हजार हेक्टरला फायदाप्रकल्पाची किंमत सुमारे पाच हजार कोटींच्या आसपास जाऊ शकेल, असा अंदाज आहे.आता या प्रकल्पाला मंजुरी मिळवून सिन्नर तालुक्यातील २८ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल. तालुक्यातील ९५ टक्के गावांचा सिंचनाचा प्रश्‍न सुटेल. आराखडा तयार करण्यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता भासल्यास राज्य शासनाकडून तरतूद करून देऊ. देवनदी-शिवनदी जोडून पाणी सुळेवाडी, बारागाव पिंप्री, पाटपिंप्री, गुळवंच, कोमलवाडी, हिवरगाव, कीर्तांगळी शिवाराला देणे तसेच कोनांबे धरणातून डुबेरे, मनेगाव, पाटोळे, गोंदे, दोडी व थेट नांदूरशिंगोटे असा बंदिस्त कालवा निर्माण करण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याचे आमदार कोकाटे यांनी अधोरेखित केले.दमणगंगा-वैतरणा-कडवा-देवनदी जोड प्रकल्प स्थळपाहणीप्रसंगी आमदार माणिकराव कोकाटे, रामा राजू, एम. एन. राव, नायर, शिंपी, सोनवणे, अविनाश लोखंडे आदी. (२२ सिन्नर १)

टॅग्स :sinnar-acसिन्नरwater transportजलवाहतूक