मथुरपाडेत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 17:56 IST2020-07-21T17:55:15+5:302020-07-21T17:56:15+5:30
मालेगाव : तालुक्यातील मथुरपाडे येथे स्वाभीमानी शेतकरी संघटनेतर्फे दूधाचे दर वाढवून मिळावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.

मथुरपाडेत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन
मालेगाव : तालुक्यातील मथुरपाडे येथे स्वाभीमानी शेतकरी संघटनेतर्फे दूधाचे दर वाढवून मिळावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. आंदोलकांतर्फे अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलेल्या आवाहनानुसार आज राज्यभर दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले.
दूधाला आठ रुपये वाढवून भाव मिळावा. शासनाने दूध पावडर आयात बंदी करावी आदी मागण्यांसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी होऊन शनिदेवाला अभिषेक करीत गरीबांसह उपस्थितांना मोफत दूधाचे वाटप करुन शासनाचा निषेध केला. आंदोलनात संजय जाधव, अंकुश जगताप, विजय शिंदे, सुकदेव वाकचौरे, पोपट आवारे, डॉ. शरद पवार आदी उपस्थित होते. तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक ठाकरे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.