राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे संचलन
By Admin | Updated: January 19, 2017 00:51 IST2017-01-19T00:50:47+5:302017-01-19T00:51:05+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे संचलन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे संचलन
अभोणा : अभोणासह कळवण, सटाणा, मालेगाव आदि भागातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्त्यांतर्फे गावातून संचलन करून तिळगूळ वाटप करून संक्रांतोत्सव साजरा करण्यात आला. गावातील नवीन सिडको परिसर ते पुरातन कृष्ण मंदिर असे संचलन करण्यात आले. यावेळी बालगोपाळ कार्यकर्त्यांसह परिसरातील संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
संचलन सुरु असताना गावातून पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. यावेळी मालेगाव येथील जिल्हा कार्यवाह प्रमुख वक्ते सुनील चव्हाण, कळवण तालुका कार्यवाह एम.पी. कोष्टी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कळवणचे दीपक वेढने, बापू देवघरे, पवन कोठावदे , पुष्कर वेढने, स्वप्नील शिरोरे, अभोण्यातील भाजपा युवा अध्यक्ष किरण पाठक, सचिन म्हस्के, राजेश सोनवणे, अनिकेत सोनवणे, भय्या हिरे, नीलेश बिरार, चेतन दिवाण, नीरज सूर्यवंशी, वैभव मुठे, कुणाल सोनवणे, विनीत महाजन, तन्मय वेढणे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)